Posts

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात

Image
सितादही करुनच कापुस वेचणी. नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे         सृष्टीची निर्मिती जारज, श्वेतज, जलज, अंडज, बीजज या सर्व पद्धतीने झाली. बीजजपासून निर्मित कापसाच्या बोंडाने समग्र सृष्टीतील जारज निर्मित मानवाचे अंग झाकून लज्जारक्षण केले. कापसापासून वस्त्र तयार करण्यात आले.  बळिराजाकरिता जणू पांढरे सोनेच सृष्टीने तयार केले. सध्या शेतशिवारांमध्ये हाच कापूस निघाला असून तो वेचण्याची तयारी सुरू झाली आहे. कापूस बोंडातून काढण्यालाच वेचणी म्हणतात, आणि ही वेचणी सुरू करण्यापूर्वी जो काही विधी केला जातो, त्यालाच सीतादही असे ग्रामीण भागात संबोधले जाते. हरितक्रांतीपूर्वी पारंपरिक बियाणे व नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान नसल्याने कापूस शक्यतोवर दिवाळीनंतरच निघायचा. हल्ली तंत्रज्ञानाने संशोधित कापूसवाणाचे बियाणे अल्पावधीतच कापूस देते. तसेच सिंचनाची सोय झाल्याने पावसाळ्यापूर्वीच लागवड होत असल्याने विजयादशमी पूर्वीच कापूस वेचणीस सुरुवात होते. बळिराजा व महिला मजूर सीतादही पूजन केल्याशिवाय कापूस वेचत नाही.  पुर्वी शेतकरी ज्वारी सोंगणी, खुडणी, मळणी करून ज्वारी घरात घेत नाही, तोच सीतादहीच्या तयार