बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.
दैनंदिनी प्रवाशाची गैरसोय, चालू बस बंद झाल्याने प्रवांशामध्ये संताप.
उत्तम ब्राम्हणवाडे.
येथील बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव पर्यंत मार्गक्रमण करणारी प्रवासी बस बंद पडल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हि बस ग्रामीण भागातील २० गावातील शालेय विद्यार्थी ये-जा करत होती तसेच इतर प्रवाशांनाही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावामधून मार्गक्रमण करत प्रवाशांना सोयीची होती.शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी लागताच गेल्या काही दिवसापासून ही बस आली नसुन बंद पडली आहे.
अंजनगाव बारी बस स्टाँपवर ही बस दिवसातून तीन वेळ विविध वेळात मार्गक्रमण करीत होती.अचानक ही बस बंद पडल्याने प्रवासी नागरिक दररोज नियोजित वेळात बस स्टाँपवर वेळोवेळी तात्काळत बसची वाट पाहत बसावे लागत आहे. कुठलीही पुर्वसुचना न देता महामंडळाने ही बस बंद केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही बस लवकरात लवकर पुर्वव्रत सुरु करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून होत आहे.
Comments