वसंताची चाहूल लागताच पानगळाला सुरुवात.

नांदगाव खंडेश्वर  
उत्तम ब्राम्हणवाडे 
 ऋतुचक्रानुसार रूप बदलणाऱ्या रानात शुष्क असा शिशिर ऋतू सुरु झाला असून झाडांच्या पान गळतीला सुरूवात झाली आहे. निसर्गात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 'भारतीय ऋतू निसर्गातील विविध बदलांची नांदी देतात.मार्गशिर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो. म्हणजेच डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध, जानेवारी महिना व फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात शिशिर ऋतू असतो.
 या ऋतूचे वैशिष्टय म्हणजे 'झाडांची पानगळ' सुरू झाली कि शिशिर ऋतू सुरू झाला असा जनमानसात समज आहे. लांबलेल्या पावसाने निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलवून टाकले होते. मात्र ठराविक काळानंतर येणारे ऋतूचक्र सतत सुरू असून शिशिर ऋतूने पानगळीला सुरुवात केली आहे.निसर्गाला नवे रूप देणारा हा ऋतू शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जातो. जानेवारी, फेब्रुवारी महीन्यात असणारा हा ऋतू थंडीचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो. रानात शिशिराची पानगळ झाली असून झाडांची पाने पिवळीगर्द होवून गळण्यास सुरुवात झाली आहे. या गळतीमुळे रानात सर्वत्र पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या ऋतूतील सणही ऋतूमानाचा विचार करून आहार विहार देतात. झाडांची झालेली पानगळ शेतकऱ्यांना उर्मी देवून जाते. झाडांचा गळलेला हाच पालापाचोळा शेतकरी शेतीसाठी वापरतात.

झाडांची पाने गळणे ही नैसर्गिक बाब असून ज्या झाडांची पाने रुंद,लांब असतात अशीच पाने गळतात. या दिवसात झाडांच्या मुळांना पाणी पुरवठा चांगला व्हावा या हेतूने हि क्रिया घडत असते. हा पानगळीचा उपयोग शेतकऱ्यांना होऊन राब म्हणून शेतकरी त्यांचा उपयोग करतात. - जयंत पुसदकर (माजी मुख्याध्यापक)रामराव भोयर विद्यालय,नांदगाव खंडेश्वर. शिशिर ऋतूचे आगमन झाले असून रानावनात सर्वत्र पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. झाडांची मोठी पाने या ऋतूत गळून पडतात व नवीन पाने येण्यास सुरुवात होते. हा ऋतू नवीन पालवी फुटण्यासाठी अनुकूल असून यानंतर वसंत ऋतू सुरू होईल. - प्रा. नितीन टाले निसर्गप्रेमी,नांदगाव खंडेश्वर

Comments

Anonymous said…
👍
Anonymous said…
खूप खूप अभिनंदन भाऊ

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात