आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती धुमधक्यात साजरी करा,उत्तम ब्राम्हणवाडे यांनी केले आवाहन.
२० फेब्रुवारी रोजी शासन करणार शासकीय स्तरावर जयंती साजरी.
अमरावती
शासन हे पूर्वी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ही शासकीय स्तरावर साजरी करीत नव्हते त्यामुळें आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती ही शासकीय स्तरावर साजरी करण्याकरिता पॉवर ऑफ मीडिया या पत्रकारांच्या अग्रणी संघटनेने शासनाकडे सन २०१६ पासून सतत पाठपुरावा केलेला असून त्या पाठपुराव्याचे फलित म्हणून शासनाने ही मागणी मान्य करुन थोर पुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येणाऱ्या शासकीय परिपत्रकामध्ये याबाबतची अधिकृत नोंद नुकतीच केलेली आहे आणी याबाबतचे तसे शासकीय परिपत्रक सुद्धा शासनाच्या वतीने काढले आहे त्यामुळे आता मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दरवर्षी दि.२० फेब्रुवारी रोजी शासनस्तरावर साजरी करण्यात येणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील पत्रकार जगतामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी एकजुटीने येऊन दि.२० फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात आणि धुमधडाक्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करावी असे आवाहन पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे अमरावती विभागाचे अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांनी राज्यातील सर्व पत्रकारांच्या संघटना आणि पत्रकार बांधवांना प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Comments