बायफ २६२ गावात घेणार महिलांच्या शेतीशाळा.

आयटीसीचे सहकार्य,क्लायमेट स्मार्ट शेती प्रकल्प.

कृषी अवजार बँकेचे देणार प्रशिक्षण.

 उत्तम ब्राम्हणवाडे.

          आयटीसी मिशन सूनहरा कल अंतर्गत बायफ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर,भातकुली व अमरावती तालुक्यातील निवडक गावामध्ये "क्लायमेट स्मार्ट शेती कार्यक्रम" मागील काही वर्षापासून बायफ संस्थेच्या माध्यामातून राबविला जात आहे. सदर प्रकल्प हा ग्रामीण भागातील विकासासाठी असून त्यामध्ये महिला शेतकरी व बचत गटाच्या महिला सशक्तीकरनातून; त्यांचा समाजिक व आर्थिक स्थर उंचावण्यासाठी विविध घटकांची अंमलबजावणी केल्या जात आहे.
            या प्रकल्पाच्या अंतर्गत निवडलेल्या गावाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध घटकांची अंमलबजावणी केल्या जात असून प्रामुख्याने महिला बचत गटाच्या उपजीविकेसाठी निवडक बचत गटाला 'कृषी अवजार बँकेचे' व्यावसायिक प्रशिक्षण देऊन व काही समूहांना कृषि अवजार उपलब्ध करून देऊन त्यातून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे करण्यात आयटीसी मिशन सूनहरा कल व बायफ यंत्रनेचा मोठा वाटा आहे. त्यासोबतच बचत गटाला जोडून ऍग्री बिझनेस सेंटर च्या माध्यमातून बियाणे बँक,जैविक खत व औषधी,कृषीवर आधारित लघु उद्योग उभे करणे व त्यांना प्रशिक्षण देऊन सविस्तर मार्गदर्शन सुद्धा केल्या जात आहे. गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील विविध बचत गटाला कृषी अवजार बँक केंद्राचे प्रशिक्षण दिले असून त्यामधून ८२ कृषी अवजार बँक केंद्र भक्कमपणे सुरू झालेली आहेत व आज त्या महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत. 
             यावर्षी भातकुली, नांदगाव खडेश्वर व अमरावती तालुक्यात निवडक गावात शेती व महिला शेतकरी या बाबीला केंद्रीभूत करून बदलत्या हवामान व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खरीप हंगामात ''महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा" अमरावती जिल्ह्यातील २६२ गावात राबविल्या घेतल्या जाणार आहेत. सोयाबीन,कपासी पिकाच्या अल्पखर्चिक बदलत्या हवामानावर आधारित; गावात निवडलेल्या सुपर चॅम्पियन शेतकऱ्यांच्या डेमो प्लॉटवर पेरणीपासून ते काढणीपर्यंत चे मार्गदर्शन केल्या जानार आहे. त्यासोबतच सोयाबीन पिकाचे भरघोस उत्पादनासाठी उत्तम गुणवत्तेचे बियाणे, बीबीएफ-रुंद सरी वरंबा पद्धतिने पेरणी पध्दत; जिल्ह्यात पहिल्यांदा आयटीसी प्रकल्पाने सुरुवात केलेली होती व आज त्या तालुक्यातील 75% शेतकरी बीबीएफ पद्धतीने पेरणी करीत आहेत व प्रतिसाद सुध्दा वाढत आहे. त्यापलीकडे जाऊन उत्पादन मालाला मार्केट मध्ये चांगला भाव मिळवून देऊन; बियाणे बँक सुध्दा आज गावागावात प्रकल्पाच्या माध्यमातून उभ्या झालेल्या आहेत. एकंदरीत बायफ शेतकऱ्यांना वरदान असल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांन कडून बोलले जात आहे.
....................................................................
.....................................................................

"क्लायमेट स्मार्ट गाव प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून आर्थिक स्थर उंचावण्यासाठी बायफ संस्था अविरत प्रयत्नशील राहील; प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या विविध घटकांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा"
- शैलेश भगत, 
अति. मुख्य कार्यक्रम अधिकारी- बायफ
.....................................................................
.....................................................................

आयटीसी मिशन सूनेहरा कलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशाळेतून आधुनिक शेती लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांचा आर्थिक स्थर कसा वाढविता येईल; यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोबतच शेती आधारित व्यवसाय प्रशिक्षण देऊन महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा आम्ही कटिबध्द आहोत. 
- राहुल इंगोले, 
जिल्हा कार्यक्रम अधिकारी
......................................................................

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १९१ एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केंद्रे बंद होणार ?

माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो या कारणावरून केला युवकाचा खून.

जिल्हा भरारी पथकाची नांदगाव खंडेश्वर येथे धडक कार्यवाही.