तालुक्यात जिकडे - तिकडे बहरला पळस.

शिशिरातील पानगळ सरकली मागे
पळसाचे फुले घेत आहेत मन मोहून.
उत्तम ब्राम्हणवाडे 
सध्या थंडीचे दिवस संपून उष्ण काळ सुरू होत आहे उन्हाळा सुरू होण्याआधी ऋतुचक्राच्या आसाभोवती फिरणारी समग्र चराचर सृष्टी ही संक्रमणाच्या उंबरठय़ावर उभी असल्याचे जाणवत असून. पावलापावलांनी शिशिरातील पानगळ मागे सरकत आहे उन्हाळ्याच्या आगमनासाठी पुढे सरसावलेल्या वसंताच्या अस्तित्वखुणा सृष्टीच्या माथ्यावर उमटू लागल्या आहेत. सृष्टीत सर्जनाची प्रक्रिया गतिमान होण्याच्या या काळात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्या जिकडे तिकडे पळसाची झाडे बहरू लागली असल्याचे दिसून येत आहे. पळसाचा हा बहर नंतर पार उन्हाळा संपेपावेतो टिकतो.सध्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जिकडे-तिकडे 
 पळसाच्या झाडांना अत्यंत मनमोहक अशी रंग बिरंगी फुले आल्याने नागरिकांची मने मोहून टाकत आहेत या पळसाच्या फुलासमवेत फोटो काढण्याचा मोह युवक युवतींना आणि नागरिकांना सुद्धा आवरल्या जात नसून.सध्या उन्हाळा सुरू होत असल्याने, झाडांना पानगळ लागली आहे आणि वृक्षांचे सांगाडेच काय ते उरलेले दिसून येत आहेत. आणि या उन्हावळीतही बहरणारी झाडे तशी मोजकीच असून तालुक्यात या दिवसांत पळस आपले लक्ष वेधून घेत आहे.
पळसाच्या एका डहाळीवर तीनच्या संख्येत पाने असतात. आणि पळसाला चपटय़ा शेंगा येतात. त्यांना ‘पळसपापडी’ म्हणतात. पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुले होतात. दरम्यानच्या काळात पाने झडतात. तसे पाहिले तर पळसफुले ही जशी लालभडक असतात तशीच ती पिवळी आणि पांढरीही असतात. ही सर्वत्र आढळतात ती लालभडक पळसफुले. पिवळी त्यामानाने कमी असतात,आणि ही पळसफुले दिसायला अतिशय आकर्षक असली तरी झाड मात्र अनाकर्षक असते.पळस हा आकारहीन असून पळसाच्या झाडाला जसा आकार नाही, तसाच त्याच्या फुलांनाही गंध नाही. पळस फुलतो तेव्हा अनेक पक्षी पळसवनात येतात आणि किलबिलाट करीत पळसाच्या झाडावर उतरतात. पळसाच्या फुलांत बराच मध असतो. तो ते प्राशन करतात. याच मधासाठी नंतर मधमाश्याही येतात. मधमाश्यांच्या गुंजारवाने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे हा अनाकर्षक पळस जणू काही ‘गाणारे झाड’च होऊन जात आहे.या पलासामध्ये अनेक औषधी गुण सुद्धा आहेत.
नागरी वस्तीचा अभाव असलेल्या मोकळ्या माळरानावर ती आवर्जून दिसून येत आहेत. जंगलातील जमिनीचा कस कमी होऊ लागला, की पळसाचे प्रमाण वाढते. तालुक्यातील शेतात आणि डोंगराळ भागात ही पळस फुले मोठ्या प्रमाणात फुलली असल्याने निसर्ग प्रेमींसाठी ही एक पर्वनीच ठरत आहे तालुक्यातून गेलेल्या समृध्दी महामार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असून या डोंगराळ भागावर पळसाची झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि या सर्व पळसाच्या झाडांना या दिवसात मोठ्या प्रमाणात फुले आल्याने या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मने मोहून जात आहेत.होळीच्या दिवशी या फुलाचा रंग तयार करण्यात येतो हे विशेष !

झाडाच्या पडलेला पालापाचोळ्याचा  शेतीसाठी होतोय उपयोग
-------------------------------------

 ऋतुचक्रानुसार रूप बदलणाऱ्या रानात शुष्क असा शिशिर ऋतू सुरु झाला असून झाडांच्या पान गळतीला सुरूवात झाली आहे. निसर्गात वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 'भारतीय ऋतू निसर्गातील विविध बदलांची नांदी देतात.
मार्गशिर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो. म्हणजेच डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध, जानेवारी महिना व फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात शिशिर ऋतू असतो. या ऋतूचे वैशिष्टय म्हणजे 'झाडांची पानगळ' सुरू झाली कि शिशिर ऋतू सुरू झाला असा जनमानसात समज आहे. लांबलेल्या पावसाने निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलवून टाकले होते. मात्र ठराविक काळानंतर येणारे ऋतूचक्र सतत सुरू असून शिशिर ऋतूने पानगळीला सुरुवात केली आहे.निसर्गाला नवे रूप देणारा हा ऋतू शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जातो. जानेवारी, फेब्रुवारी महीन्यात असणारा हा ऋतू थंडीचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो. रानात शिशिराची पानगळ झाली असून झाडांची पाने पिवळीगर्द होवून गळण्यास सुरुवात झाली आहे. या गळतीमुळे रानात सर्वत्र पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या ऋतूतील सणही ऋतूमानाचा विचार करून आहार विहार देतात. झाडांची झालेली पानगळ शेतकऱ्यांना उर्मी देवून जाते. झाडांचा गळलेला हाच पालापाचोळा शेतकरी शेतीसाठी वापरतात.

-----------------------------------------
झाडांची पाने गळणे ही नैसर्गिक बाब असून ज्या झाडांची पाने रुंद,लांब असतात अशीच पाने गळतात. या दिवसात झाडांच्या मुळांना पाणी पुरवठा चांगला व्हावा या हेतूने हि क्रिया घडत असते. हा पानगळीचा उपयोग शेतकऱ्यांना होऊन राब म्हणून शेतकरी त्यांचा उपयोग करतात.  
- जयंत पुसदकर
  (माजी मुख्याध्यापक)
रामराव भोयर विद्यालय,नांदगाव खंडेश्वर.
----------------------------------------
शिशिर ऋतूचे आगमन झाले असून रानावनात सर्वत्र पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. झाडांची मोठी पाने या ऋतूत गळून पडतात व नवीन पाने येण्यास सुरुवात होते. हा ऋतू नवीन पालवी फुटण्यासाठी अनुकूल असून यानंतर वसंत ऋतू सुरू होईल. 

- प्रा. नितीन टाले 
 निसर्गप्रेमी,नांदगाव खंडेश्वर

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात