अखेर नांदगाव खंडेश्वर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वतंत्र कार्यालयाला मंजुरी.

 कार्यालयाचे नवीन इमारती साठी चाळीस लाख मंजूर

कार्यालय होणार अद्यावत. 

डॉ. स्वप्निल मालखेडे यांची माहिती. 

नांदगाव खंडेश्वर 

महाराष्ट्रातील सर्वच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना कार्यालयाकरीता स्वतंत्र इमारत नसल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना तालुक्याच्या पंचायत समिती किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात एका छोट्या कार्यालयात आपले कामकाज करावे लागत होते. त्यामुळे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे नांदगाव खंडेश्वर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता स्वतंत्र इमारत नसल्याने त्यांना सुद्धा अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता येथे कार्यालयाची स्वतंत्र इमारत व्हावी याकरिता अनेकदा शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला अखेर त्या मागणीला यश येऊन नांदगाव खंडेश्वर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वतंत्र  कार्यालयाच्या इमारती करीता महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून 15 व्या वित्त आयोगामध्ये ४० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे नांदगाव खंडेश्वर येथील तालुक्यातील


अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र इमारतीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकरीता नवीन इमारती होणार आहेत. या इमारती अत्यंत सुसज्ज अशा असणार असून याकरिता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ४० लाखाचा निधी मंजूर केला आहे या निधीमधून तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय,सुसज्ज अशी रक्त तपासणीची लॅब, कर्मचाऱ्याकरिता कार्यालय, आणि एक मीटिंग हॉल यांचा समावेश असणार आहे. या कार्यालयाच्या बांधकामाला अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुरुवात करण्यात आलेली आहेत ही सर्व कार्यालय महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच बांधण्यात येत असून असा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र जीआर काढलेला आहे. नांदगाव खंडेश्वर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या स्वतंत्र कार्यालयाकरिता नवीन इमारतीचे बांधकाम होत असल्याने आता यामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि  आशा वर्कर्स यांना काम करण्यास मोठी सोय होऊन उपलब्ध होणार आहे.



नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी यांना स्वतंत्र कार्यालयाची अत्यंत आवश्यकता होती याकरिता आम्ही सतत शासनासोबत पत्र व्यवहार केला आणि त्याकरिता शासनाकडून 40 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे यामुळे आमची मोठ्या प्रमाणात सोय झालेली आहे प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयामध्ये शासनाने आता एम.पी.डब्ल्यू.ही एक नवीन पोस्टिंग मंजूर केलेली आहे ती सुद्धा लवकरच भरण्यात येणार आहे.

- डॉ. स्वप्नील मालखेडे

(तालुका वैद्यकीय अधिकारी नांदगाव खंडेश्वर.)



शासनाच्या आरोग्य विभागाने ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकरिता स्वतंत्र कार्यालयाच्या इमारती मंजूर केल्या आहेत त्याचप्रमाणे  या कार्यालयाच्या बाजूलाच T.M.O.तसेच त्यांच्या सर्व कर्मच्याऱ्याकरिता शासकीय निवासस्थान बांधून देण्यात यावे आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देण्याकरिता एकचार चाकी शासकीय वाहनसुद्धा शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ती मागणीसुद्धा शासनाने लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे. 


Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात