वाळवणी पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग.
पहाटेपासून महिलांचा सुरू होतोय उद्योग
पापड , शेवळ्या ,लघू उद्योगांमुळे अनेकांच्या हाताला काम
उत्तम ब्राम्हणवाडे
अरे संसार संसार या बहिनाबाईच्या कवितेप्रमाणे महिलांना घरात काय हवय काय नको? याची नेहमी चिंता असते. म्हणूनच नांदगाव खंडेश्वर शहरा सह तालुक्यातील ग्रामीण भागात महिलांची वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी लगभग सुरू झाली आहे.
महाराष्ट्रात पुर्वी शेती मशागतीतून उसंत मिळताच व पुढे लग्नकार्य असल्यास किंवा हातचे पदार्थ म्हणून गव्हापासून शेवया, कुरडया, बाजरीपासून खारोड्या बडे, ज्वारीपासून पापड, तांदळापासून पापड, चकल्या, उडीदा व मुगाची डाळीपासून पापड, मुंगवडया, बटाट्यापासून चिप्स, चकल्या, शाबुदाना चिप्स, चकल्या आदी वाळवणाचे पदार्थ वर्षभर घरात वेगवेगळ्या वेळी किवा सणावारा सह उपवासासाठी तळून वापरले जातात.
हा वाळवना प्रत्येक घरात असावेत यासाठी महिलांची धडपड असते. पूर्वी सर्व खरीप रब्बी पिके धरात काढुन आणल्यानंतर ग्रिष्मवृतुमध्ये शेती मशागत कामे थांबताच महिला या उन्हाळी वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी कामाला लागतात हा उद्योग एकटी दुकटीला जड वाटत असल्याने एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे धरून बांधून शेजारणी पाजारनी यांना एकत्र घेवून हा उद्योग सुरू होतो. शहरात यंत्र उद्योग उपलब्ध व बाजारात तयार मिळत असल्याने आणि आता यंत्र बचत गटांच्या समुह उद्योगातून उपलब्ध होत असल्याने विकत घेतात .परंतु ग्रामीण भागात महिला ह्या वस्तु घरीच तयार करत असतात. आता शेवया तयार करण्याचे यंत्र आले असून त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना रोजगार तयार झाला आहे. तर काही महिला रोजंदारीवर मदत करत असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे. पूर्वी शेवया फटी पाटावर केल्या जात असत त्याची चव व पध्दत वेगळीच होती. आता मशीनद्वारे अनेक पदार्थ बनविले जात असल्याने महिलांचे काम सोपे झाले आहे. यामुळे महिलांमध्ये आनंद दिसून येतो.
----------------------------------------
बाजारात सर्वत्र तयार केलेल्या वस्तू मिळत असल्याने , चोखंदळ खवैय्याना घरगुती स्वादापासून अनभिज्ञ राहावे लागते . म्हणून ग्राहकांच्या आग्रहा खातर आम्ही घरीच तांदळाचे पापड , कुरडया , आलू पापड , चिप्स , शेव , ज्वारीचे पापड , नाचणीचे पापड , फिंगर , गव्हाचे सरगुंडे , रव्याच्या शेवया व ईतर पदार्थ घरी बनवून विक्री केल्या जाते .
पुर्वी हाताच्या साच्याने शेवया बनवायची. आता शेवया मशीन घेतली. त्या मशीनद्वारे ग्राहकांना आर्डर प्रमाणे शेवया तयार करून देते . घरची सर्व कामे सांभाळून हे सर्व तयार करते .
-सौ.रेणुका रघुते,
शेवळ्या,उत्पादक,नांदगाव खंडेश्वर.
----------------------------------------
आधुनिक युगात सर्व रेडीमेट पदार्थ मिळत आहे , यामुळे बाजारात चवीनुसार पदार्थ मिळत नसल्याने आमच्या घरी यावर्षी निमिर्ती केलेल्या तांदळाच्या कुरडया , नाचणीचे पापड , मुंग - उळीदाचे पापड व ईतर वळवणीचे पदार्थ तयार केल्या जाते म्हणुन वाळवणी पदार्थ बनवण्याची लगभग सुरू आहे. घरी परिश्रमाने बनवलेल्या पदार्थाची चव वेगळीच असते. सध्या मला या कामात आजूबाजूच्या शेजारणीची मदत मिळते.
- सौ,इंदिरा रेवतकर
गृहणी,नांदगाव खंडेश्वर
Comments