नांदगाव खंडेश्वर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी.
पॉवर ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे आयोजन.
नांदगाव खंडेश्वर
मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती या वर्षीपासून शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून तत संबंधीचा अध्यादेश सुद्धा काढला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सगळे पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे याच अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर येथील पॉवर ऑफ मीडिया तालुका शाखेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती त्यांना आदरांजली वाहून साजरी करण्यात आली.
येथील विश्रामगृहामध्ये झालेल्या छोट्या ठिकाणी कार्यक्रमात सर्व पत्रकार बांधवांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना नमन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुकाध्यक्ष प्रशांत झोपाटे हे उपस्थित होते. यावेळी जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश कानबाले संचालन उमेश चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सागर गावनेर यानी केले या कार्यक्रमाला पावर ऑफ मीडियाचे पदाधिकारी रमेश गंजीवाले,प्रदीप रघुते,अनिकेत शिरभाते, निकेत ठाकरे,प्रमोद देशमुख, अत्तरखान,विनेश बेलसरे, पवन ठाकरे,सागर सव्वालाखे,मनोज जैन,शिवाजी उईकें,गजानन भस्मे,विजय नाडे,देविदास गाडेकर,अवधूत गाडेकर,गोकुळ खोडके,अंकुश निमनेकर,संदेश ढोके, योगेश राऊत,इत्यादी पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होती.
Comments