नगर पंचायत निवडणूक लांबणीवर पडताच इच्छुक झाले भूमिगत...

उत्तम ब्राम्हणवाडे 
कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली वाढताच इच्छुक चांगलेच सक्रिय झाले होते. भावी आणि आजी- माजी नगरसेवक आपला वॉर्ड आणि प्रभागातील गल्ली बोळात छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी खिसा रिकामे करीत होते. चहा- पाण्यावरही खर्च केला जात होता. परंतु पुन्हा निवडणुका लांबणीवर पडल्या आणि इच्छुक व आजी नगरसेवक भूमिगत झाले. अनेकांनी छोट्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणेही थांबवले आहे.
सात- आठ महिन्यांपूर्वी - नगर पंचायतीची प्रभाग रचना नव्याने करून मतदार याद्याही प्रसिध्द झाल्या होत्या. शासनाच्या निवडणूक घेण्याच्या हालचाली वाढताच आजी-माजी नगरसेवक व इच्छुकांच्या हालचालींना वेग आला. सारेच जोमाने तयारीला लागले. निवडणूक लढवाचे हे निश्चित करून इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागातील दादा, बाबा, मामाचे वाढदिवस थाटात साजरे करत होते. अनेकांनी चहा पाणी इतर खर्चावर खिसा रिकामा करायला सुरुवात केली होती. एरवी सकाळी दहा वाजता उठून आरामात घराबाहेर पडणारे इच्छुक सकाळी ६ वाजताच खादीचे कपडे घालून घराच्या बाहेर पडत होते. दिवसभर लहान सहान कार्यक्रमांना हजेरी लावत होते. परंतु अचानक आणि अनअपेक्षितरित्या राज्यात सत्ताबदल झाला. ओबीसी आरक्षण व इतर कारणामुळे पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे आजी - माजी नगरसेवक आणि इच्छुक पुन्हा एकदा कोमात गेले असून अनेकांनी कार्यक्रमांना हजेरी लावणेही थांबवले आहे. चहा पाण्याचे कार्यक्रम अन् वाढदिवसाचे सोहळेही बंद झाले आहेत. या प्रकाराने मतदारही जागृक झाले असून निवडणुकीच्या तोंडावर वाट्टेल ते करणाऱ्यांना ओळखणे सोपे झाले आहे.
 नगर पंचायतीच्या निवडणुका लांब पडल्याने नगर पंचायतमध्ये प्रशासक राज सुरू आहे. यामुळे नगरसेवक हे पंचायतीकडे फिरकत नाहीत.. ते कुठे फारसे दिसतही नाहीत. यामुळे नागरिकांच्या लहान मोठ्या समस्या वेळेत सुटत नाहीत. स्वच्छता व पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनली आहे. कोणी वालीच नसल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा आजी - माजी आणि भावी नगरसेवक चांगलेच सक्रिय झाले होते. आता तेही थंडावल्याचे दिसत आहे. अनेक जण तर साधा फोनही घेत नाहीत.
- एक मतदार

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात