वैद्यकीय व्यवसायातील सेवाभाव होतोय लुप्त .

उत्तम ब्राम्हणवाडे पूर्वीच्या काळात घरोघरी भेट देत रुग्णसेवा देणारा डॉक्टर आधुनिक युगात दिसेनासा झाला आहे .मात्र ही जागा शहराप्रमाणे अनेक तालुकास्थळी असलेल्या खाजगी रुग्णालयात ऍडमिट नामक प्रकार हा सक्तीचा झाला आहे . देवाचे दुसरे रूप म्हणून डॉक्टरांचे नाव घेतले जाते . रुग्णाला वाचविण्यासाठी त्याच्या कुटुंबातील नातेवाईक मिळेल तसा त्रास सहन करीत असतात. पण डॉक्टरांच्या भरमार शुल्क वाढीने सेवाभाव लुप्त होत असल्याचे बोलले जाते आहे .
 कुणाच्या घरी रोगराई आली की प्रथम देवाचे नामस्मरण केले जाते . रोगराई बरी होण्यासाठी कोणी प्रार्थना ,कुणी वंदना तर कुणी वेगवेगळ्या पद्धतीने देवाची पूजा पाठ करण्याची पद्धत आहे . ही पद्धत केल्याने रोगराई घरातून जात नसली तर अखेर दुसरा देव म्हणजे डॉक्टर होय .पण आधुनिक युगात वैद्यकीय पेशा सेवाभावी की व्यवसायी असा प्रश्न पडत असून भरमार आकारणाऱ्या डॉक्टरांची फी व औषधी खर्च सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरचा झाला आहे .
तसेच ज्या खाजगी रुग्णालयात रुग्ण ऍडमिट झाल्यावर त्या रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याच रुग्णालयात असलेल्या औषधालायातून औषधी घ्यावी लागते .त्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागत आहे. कित्येक रूग्णालयात तर जेवणापासून ते औषधपर्यंत सेवा उपलब्ध असते .बहुतांश रुग्णालयात चोवीसतास सेवा प्रकाशनारा फलक दिसून येतो .
डॉक्टरांना भेटण्याची वेळ शस्त्रक्रीयाकरीता लागणारे शुल्क यासह इतर सेवांचा दरफलक बघीतल्यास वैद्यकीय सेवा ही खरंच सेवा आहे काय ? किंवा व्यवसाय झाला आहे . 
त्यामुळे प्रत्येक खाजगी रुग्णालय मोठ्या शहरातून विशिष्ट दिवशी तज्ञ डॉक्टरांना बोलावून उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात खरेदी करता रुग्णांचा शोध घेतल्या जातो . बरेचदा तालुकास्थळी असलेले डॉक्टर रुग्णावर उपचार करण्यास असमर्थ ठरल्यास मोठ्या शहरातील विशिष्ट डॉक्टरांकडे पाठवीत असतात .
रुग्णांना महागडा उपचार करून सुद्धा रुग्ण बरा होत नाही . त्यामुळे अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होतात .परंतु शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा प्राप्त होत नसल्याने , नाईलाजास्तव सर्वसामान्य रुग्णांना अखेर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे वैद्यकीयपेशा हा सेवाभावी की व्यवसाय हे आजच्या काळात ओळखणे कठीण झाले आहे .

खाजगी डॉक्टरांना त्यांच्या संघटनेने कडुन आकारून दिलेल्या प्रमाणे फि तसेच दर आकारलेले असतात . यामध्ये बीएएमएस , एमबीबीएस , एम डी , एमएस व ईतर डॉक्टरांच्या फी चे दर वेगवेगळ्या प्रमाणे असतात . रुग्णांवर औषधोपचार करणे हे डॉक्टरांवर अवलंबून असते . रुग्णांवर कोणत्या पध्द्तीचा उपचार करावा हे संबधीत डॉक्टर ठरवितात . प्रत्येक रुग्णांचे इत्यंभूत रेकॉर्ड ठेवणे गरजेचे असते .

पुरातन काळात वैद्य घरपोच जाऊन रुग्णांवर उपचार करीत होते .मात्र कालांतराने आधुनिक युगात बदल पडला .सध्यस्थीतीत तालुक्याला किंवा जिल्ह्यात जाऊन महागडे उपचार करून घेणे सर्वसामाण्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे . खाजगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून दर आकारावे . जेणेकरून त्यांची हेळसांड होणार नाही .

Comments

Anonymous said…
👌👌👌👍👍💐
Anonymous said…
एकदम बरोबर. 🙏🏻
नवनवीन बातम्या करिता कृपया फॉलो करा 🙏

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात