टिमटाळा-अंजनगाव बारी रस्ता डांबरीकरण पुन्हा रखडले
नांदगाव खंडेश्वर- बहुचर्चित आणि कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणा-या टिमटाळा-अंजनगाव बारी रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त सापडला आणि अंजनगाव बारी रेल्वे क्रॉसिंग कडून टिमटाळा मार्गे रस्ता डांबरीकरण चे मोठ्या जोशमध्ये काम सुरु झाले परंतु एक किमी रस्ता डांबरीकरण झाल्यानंतर अचानक काम बंद झाले ते झालेच ? तर दुसरीकडे झालेल्या रस्ता डांबरीकरणाला मोठमोठे खड्डे पडून गिट्टी व दगड वर आल्याने मार्गक्रमण करणारे दुचाकीस्वार आपला जीव मुठीत धरून प्रवास करित आहे. आज एक महिन्याच्या वर कालावधी लोटून गेल्यानंतरही उर्वरित रस्ता डांबरीकरण झाले नाही किंवा झालेल्या आणि लगेच उखडलेल्या डांबरीकरणाला पक्क्या डांबराचा लेप लावला नाही त्यामुळे झालेले रस्ता डांबरीकरण हे निष्कृष्ठ दर्जाचे आहे कि अपूर्ण आहे याबाबत नागरिक संभ्रमात असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्ताडांबरीकरण दुरूस्ती करून उर्वरित रस्ता डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे व याच मार्गावरील एका पुलाचे बांधकाम सुरु करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी केली आहे.
Comments