शेतात असलेल्या 64 हजार रुपये किमतीच्या केबलची चोरी.
शेलु ( नटवा ) शेतशिवरातील घटना.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खडेश्वर येथून जवळच असलेल्या (शेलू नटवा) येथील शेतकरी विनोद राऊत,देवराव जनबधू,संदीप भोयर, आणि प्रवीण निकोरे यांच्या शेतात असलेला पाणबुडी मोटारीचा 80 फुट तांब्याचा इलेक्ट्रिक केबल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असून चोरी झालेल्या केबलची किंमत अंदाजे किंमत ६४,०००
हजार रुपये असल्याची माहिती शेलू ( नटवा ) येथील शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
सदर घटना ही दि. ४/ ०३ / २०२३ च्यां मध्यरात्री घडली असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
Comments