भाजपा स्वतःच्या स्वार्थासाठी सरकारी यंत्रणाचा उपयोग करतेय.

नांदगावच्या जाहीर सभेत खा.ओमराजे निंबाळकर कडाडले 

शिवगर्जना सभेला महिला पुरुषांची प्रचंड गर्दी

उत्तम ब्राम्हणवाडे

नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना (ठाकरे गट) कडून भव्य अश्या शिवगर्जना सभेचे आयोजन येथील संत गजानन महाराज मंदिराच्या मैदानावर करण्यात आले होते. 


केंद्रातील भाजपाच्यां दळभद्री सरकारने शिवसेनेवर केलेल्या अन्याय,अत्याचाराचा पर्दाफाश करण्याकरिता नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेनेच्यावतीने भव्य अश्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला सातारा येथील शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संबोधित केले यावेळी खा.निंबाळकर म्हणाले की, केंद्र सरकारने शिवसेनेवर केलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागत असल्याचे यावेळी खा.निंबाळकर यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की,महाराष्ट्राचं शिंदे आणि फडणवीस सरकार हे राज्यात अत्यंत गढूळ राजकारण करीत असून केवळ शिवसेनेला बरबाद करण्याचं काम करीत आहेत त्यामुळे आम्ही जनतेच्या दरबारात आलो आहोत येत्या निवडणुकीत जनतेने त्यांना जागा दाखउन देण्याचे आवाहन त्यांनी केले.ते पुढे म्हणाले की,आम्ही सामान्य शिवसैनिकांना एकत्रित घेऊन पदवीधर मतदार संघात या भाजपला धूळ चारली आहे सामान्य शिवसैनिक काय करू शकतात हे आम्ही दाखऊन दिले आहे भाजपाने आमचा पक्ष आणि चिन्ह पळविले आहे आमचे आमदार,खासदार ईडी आणि सीबीआयचा धाक दाखऊन पळविले आहे पण आमचा शिवसैनिक मात्र ते पळऊ शकले नाहीत शिवसैनिक हीच आमची खरी ताकद असल्याचे खा.ओमराजे निंबाळकर यावेळी म्हणाले.


आमच्यासाठी जनता ही सर्वोच्च असून शिंदे सरकार हे पैश्याचा जोरावर चालत आहे   भाजपावाले म्हणतात की, मोदीच्या नावांवर आम्ही निवडून आलो पण आम्ही त्यांना म्हणतो की तुम्हीच स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावांवर निवडून आले आहे तुम्हाला पूर्वी कोण ओळखत होते तुमची ओळखच आमच्यामुळे झालेली आहे हे भाजपाने विसरता कामा नये आज देशात महागाईने उच्चांक गाठला आहे सर्वसामान्यांचे जगने कठीण झाले आहे.

 सिलेंडर,पेट्रोल,डिझेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे कुणी यावर  बोलायला गेले की हेच भाजपावाले ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून त्यांना गप्प करतात आणि त्यांच्या चौकश्या लावतात माझ्यावर देखील यांनी शिवसेना सोडण्याकरिता प्रचंड दबाव आणला होता मला सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रलोभने दिली आणि धमक्यासुद्धा दिल्या पण मी पक्ष सोडला नाही कारण मी स्वर्गीय बाळासाहेबांचा प्रामाणिक शिवसैनिक आहे माझे दैवत हे बाळासाहेब आणि उद्धवसाहेब आहेत आणि मी घाबरणारा शिवसैनिक नाही आपल्या शिवसैनिकांनी २०२४ च्या निवडणुकीत या कमळाबाईला त्याची जागा दाखऊन देण्याचे आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना केले यावेळी युवासेनेच्यावतीने त्यांचे भव्य असा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.


ते पुढे म्हणाले की,मोदी हे देशात दडपशाही आणि हुकूमशाही करीत आहेत आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहेत त्यामुळे आता जनतेने जागे होण्याची वेळ आली आहे मोदींना देशात कोणताही विरोधी पक्ष नको आहे विरोधी पक्षांना ते घाबरतात आणि त्यांच्या चौकश्या लावतात असा आरोपही त्यांनी या भव्य अश्या सभेत बोलताना लावला.ते पुढे म्हणाले की,भाजपा ही शिवसेनेचा हात धरून मोठी झाली आणि शिवसेनेच्याच पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आहे पाठीत खंजीर खुपसने हीच भाजपची परंपरा असून भाजपात कार्यकर्त्यांचे खच्चिकरण होते ते कार्यकर्त्यांना मोठे होऊच देत नाही सामान्य कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम फक्त आणि फक्त शिवसेनाचं करू शकते म्हणूनच शिवसेनेला संपविणे हाच एकमेव अजेंटा सध्या भाजपाचा आहे.आज देशातील शेतकरी वर्ग हा बेजार झाला असून सोयाबीन आणि कापसाला भाव नाही चना कुणी घ्यायला तयार नाही शेतकऱ्यांनी शेतीला लावलेला पैसा निघत नाही याकडे मोदी सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांच्या समस्येशी काहीही देणेघेणे नाही फक्त जाहिरात बाजीवर यांचे लक्ष असल्याचा घनाघात खा.निंबाळकर यांनी या सभेत केला ते पुढे म्हणाले की,ठाकरे आणि शिवसेना हे नाव कधीही वेगळे होणार नाही त्यामुळे शिवसैनिकांनी घाबरून जाऊ नका आपले सुद्धा दिवस चागले येणार आहेत २०२४ च्या निवडणुकीत जनतेने आणि शिवसैनिकांनी भाजपाला त्यांची जागा दाखवून घरी बसविण्याचे आवाहन खा.ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केले.सभेच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्या प्रतिमेचे आणि स्वर्गीय बाळासाहेब आणि मातोश्री स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यानंतर मंचकावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सुद्धा  शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.


यावेळी खा.ओमराजे निंबाळकर यांचे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या भव्य आतिशबाजित स्वागत करण्यात आले.

भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिकांनी कमळाबाई आणि ४० गद्दाराना धडा शिकविण्याचे आवाहन उपस्थितांना जिल्हाप्रमुख मनोज कडू यांनी केले.

..............................................        

 मुस्लिम बांधव आणि भाजपाच्या

असंख्य युवकांचा पक्षात प्रवेश

...........................................

या सभेत नांदगाव खंडेश्वर शहरातील मुस्लिम बांधवांनी तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील भाजपाच्या शेकडो युवकानी शिवसेनेत जाहीररित्या प्रवेश घेतला या सर्व कार्यकर्त्यांचा खा.ओमराजे निंबाळकर यांनी भगवा दुपट्टा देऊन पक्ष्यात स्वागत केले.मंचावर शिवसेना प्रवक्ते अनिल गाढवे,शुभांगी पाटील,गडचिरोलीचे माजी आमदार रामकृष्ण मडावी,शिवसेना नेत्या रेखा जाधव, माजी खा.अनंत गूढे, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी आमदार ध्यानेश्वर धाने (पाटील ) जिल्हाप्रमुख मनोज कडू ,बाळासाहेब भागवत,बाळासाहेब राणे,विलास सावदे,किशोर माहुरे,शोभा लोखंडे,ज्योती अवघड,पराग गुळधे,स्वराज ठाकरे, यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.या सभेचे संचालन ओंकार ठाकरे आणि प्रकाश मारोडकर यांनी प्रास्ताविक तालुका प्रमुख प्रमोद कोहळे तर आभार प्रदर्शन डॉ.प्रमोद कठाळे यांनी केले राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली या सभेला अमरावती,बडनेरा,धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर येथून मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती. सभेच्या यशस्वीतेसाठी धामणगाव रेल्वेचे तालुका प्रमुख निलेश मुंदाने, चांदुर रेल्वेचे तालुका प्रमुख संजय चौधरी दिलीप देवतळे,संजय गायगोले,उमेश चव्हाण,राजू पांडे, प्रवीण चौधरी,भूषण दुधे,संजय चौधरी, गोकुळ राठोड,प्रशांत काळे,वासुदेव लोखंडे,निलेश ईखार,प्रीती ईखार,रेवती परसंनकर,छाया भारती,अनिल बुधले,अमोल काकडे, ध्यनेश्वर केशारखाणे, विजय चव्हाले,श्रीकृष्ण काकडे,बाळासाहेब महाजन,विजय अजबले,शरद बोदडे, गुणवंत चांदूरकर,मनोहर सावंत,किशोर खारोडे, भास्कर सोनटक्के,भानुदास उगले,यांनी परिश्रम घेतले.या सभेला शिवसैनिकांनी प्रचंड अशी गर्दी केली होती. 


Comments

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !