उर्वरित अतिवृष्टीग्रस्ताना अनुदान वाटप करण्यात यावे.
उर्वरित अतिवृष्टीग्रस्ताना अनुदान वाटप करण्यात यावे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनिकेत मेश्राम यांची मागणी.
राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना दिले निवेदन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे अमरावती येथील सायन्स स्कोर मैदानातील आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याकरिता आले असता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनिकेत मेश्राम यांनी त्यांना निवेदन दिले.निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, गेल्या खरीप हंगामात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती तेव्हा राज्य सरकारने 13650 रू हेक्टरी मदत जाहीर केकेली होती व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु मार्च महिना झाला असून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली (चोर) लोणी, दाभा तसेच धानोरा (गुरव) या मंडळातील शेतकरी अतीदृष्टीच्या मदती पासून अद्यापही वंचित आहे तरी राज्य सरकारने लवकरात लवकर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी अनिकेत मेश्राम यांनी केली आहे.
Comments