उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची मातीच्या माठाला पसंती.

उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांची मातीच्या माठाला पसंती.
--------------------------------------
पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी तयार माठाची विक्री.
----------------------------------------
   उत्तम ब्राम्हणवाडे 

 मागील दोन तीन आठवड्यांपासुन वातावरणात वाढत चाललेला तापमानाचा पारा लक्षात घेता अनेकांनी या गरमीपासून बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे फ्रिज मधील थंडगार पाणी पिण्याऐवजी अनेक जण साध्या मटक्यातील पाणी पिणे पसंत करीत आहेत. त्यामुळे यावर्षी कुंभाराच्या मातीच्या मटक्याला चांगलीच मागणी वाढली आहे.
पूर्वीच्या माठाचा वापर मधल्या काळात कुठेतरी लोप पावत चालला होता. त्यातच कुंभारांना मटकी बनविण्यासाठी लागणारी माती, लाकडे, तुस, राखाडी या गोष्टी आजच्या डिजिटल युगात मिळणे कठीण झाले असल्याने या कुंभारांच्या व्यवसायावर गदा आली होती. तरीसुद्धा घेतला वसा सोडायचा नाही या जिद्दीने हा कुंभार मडकी बनविण्यासाठी लागणाऱ्या या वस्तू भले मिळत नसल्या, तरी बाहेरून रेडिमेड
मडकी आणून आपला व्यवसाय करीत आहे.
मधल्या काळात मातीच्या माठाचा व्यवसाय लोप पावत चालला आहे असे वाटत होते, मात्र दोन वर्षांपूर्वी आलेला कोरोनाकाळ आणि त्यात अनेकांची कोलमडलेली आर्थिक परिस्थितीचा विचार करून अनेक जण घशाला त्रास होऊन सर्दी खोकल्याला सामोरे जाण्यापेक्षा फ्रिजचा वापर कमी करून आणि विजेचा वापर कमी करुन साध्या माठातील पाणी पिणे अधिक पसंत करत आहेत.--------------------------------–---
अनेकजण जुन्या पद्धतीकडे पुन्हा एकदा पावले टाकत या मातीच्या माठांचा वापर करत करताना दिसत आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठया प्रमाणात मातीच्या माठाची जोरदार विक्री सुरू आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यंदा या मातीच्या माठामधे जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली असून, मोठा माठ तीनशे ते चारशे रुपये, माध्यम आकाराचा माठ अडीचशे ते तीनशे रुपये आणि लहान आकाराचा माठ दीडशे ते दोनशे रुपयांना विकले जात आहेत. मात्र किमतीत थोडी वाढ जरी झाली असली, तरी अनेकजण या मातीच्या मडक्यांकडेच आपले लक्ष केंद्रित करून तेच विकत घेणे पसंत करत आहेत.
             
ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
-----------------------------------
पूर्वी असणारी अमाप जागा,मातीचे माठ बनविण्यासाठी वापरले जाणारे इतर लाकडे, माती, राखाडी, तूस आदी गोष्टी मिळेनासे झाले असले, तरी पूर्वापार व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी बाहेरून मडकी आणून हा व्यवसाय नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कुभार बांधवांनी सुरू ठेवला आहे. रेडिमेड मटकी आणत ती महाग मिळत आहेत. त्यामुळे इच्छा नसून देखील आम्हाला ग्राहकाला थोड्या चढ्या भावाने मटके विकायला लागत आहेत. मात्र तरीदेखील यंदा ग्राहकांचा मटकी विकत घेण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात