अंजनगाव बारी-टिमटाळा ते रस्त्याचे काम पुन्हा रखडले.
अंजनगाव बारी-टिमटाळा ते रस्त्याचे काम पुन्हा रखडले.
【जि.प.सा.बा.विभागाकडून खडीकरण व डांबरीकरण झालेला १ कि.मी.रस्ता एका महिन्यात उखडला,शेतकऱ्यांसह नागरिक त्रस्त,संबंधित विभागाचे दुर्लक्ष】
उत्तम ब्राम्हणवाडे
बहुचर्चित आणि कित्येक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या टिमटाळा-अंजनगाव बारी रस्ता डांबरीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला आणि अंजनगाव बारी रेल्वे पुल क्राँसिंग ते टिमटाळा मार्गे रस्त्याचे काम मोठ्या जोशात सुरु झाले मात्र १ कि.मी.रस्ता डांबरीकरण झाल्यानंतर काम बंद झाले ते झालेच? तसेच अंजनगाव बारी रेल्वे पुल क्राँसिंग ते टिमटाळा मार्गे १ कि.मी.खडीकरण व डांबरीकरण झालेला रस्ता पुर्णपणे उखडला असून रस्त्याची चाळण झालेली अवस्था पाहून व मोठाली खड्डे व गिट्टी,दगड वर आल्याने पायदळ चालणाऱ्याना काय तर दुचाकीस्वारांनाही आपला जिव मुठीत घरून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या एका महिन्याच्या वर कालावधी लोटल्या गेल्यानंतरही या रोडचे उर्वरित डांबरीकरणाचे काम झाले नसुन तसेच झालेल्या आणि उखडलेल्या रस्त्याची अवस्था पाहून डांबरीकरणाचे काम व्यवस्थित झाले नसुन झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे कि अपुर्ण या दुहेरी संभ्राम अवस्थेत नागरिक असुन संबंधित प्रशासनाने याकडे त्वरीत लक्ष देऊन डांबरीकरणानंतर उखडलेल्या रस्त्याची दुरूस्ती व उर्वरित राहिलेला रस्ता पुर्ण डांबरीकरण तातडीने करण्याची मागणी व याच मार्गावरील एका पुलाचे बांधकाम सुरु करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी रेटून धरली आहे.
Comments