नांदगाव खंडेश्वर येथील महसूल कर्मचाऱ्यांचा संप.

नांदगाव खंडेश्वर येथील महसूल कर्मचाऱ्यांचा संप. शहरातील सर्वच शासकीय कर्मचारी संपात सहभागी. शासकीय कामकाज ठप्प नागरिकांची तारांबळ. उत्तम ब्राम्हणवाडे सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समिती तर्फे आयोजित देशव्यापी संपामध्ये मध्ये नांदगाव खंडेश्वर येथील सर्वच कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला असून या संपामुळे नांदगाव खंडेश्वर येथील सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून यामुळे तालुक्यातून विविध कामाकरीता येणाऱ्या नागरिकांची चागळीच तारांबळ उडाली.
या देशव्यापी संपामध्ये नांदगाव खंडेश्वर येथील महसूल कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला संपकऱ्यानी आपल्या मांगण्यामध्ये
जुनी पेंशन पूर्वरत सुरू करण्यात यावी यासह अनेक मागण्याचे निवेदन शासनास पाठऊन आजच्या देशव्यापी संपास आपला पाठींबा दिला आहे. या देशव्यापी संपात नादगावतील सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
यामध्ये महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अमोल दारुडकर,सचिव सुमित शृगारे यांचेसह गौरव लोखंडे,सचिन वानखडे, नीता ताथोड,अरुण जंगले,विजय दरोडी,श्रीकांत राजनकर,संतोष काकडे,सुमित ढवळे,अनिल कांबळे,अजय इंगोले,मंगेश गावनेर ,निरंजन मनोहरे,पांडुरंग राठोड, उज्वला इनवते, भीमराव ढवळे, प्रमोद ऊईके, संतोष कुऱ्हाडकर यांचे असंख्य शासकीय कर्मचाऱ्यांचा या सपामध्ये सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात