ऑनलाइनच्या जमान्यातही फिरर्त्यांची वेगळीच क्रेझ.
ऑनलाइंनच्या जमान्यातही फिरर्त्यांची वेगळीच क्रेझ.
खेडोपाड्यात आहे स्वतःची ओळख.
अद्यापही आहेत अस्तित्व राखून.
उत्तम ब्राम्हणवाडे
आज सोशल मीडिया,यूट्यूबच्या माध्यमातून अगदी घरातूनच ऑनलाइन खरेदी विक्रीला प्राधान्य दिले जात असताना शहरासह खेड्यापाड्यात घरपोच विक्री व खरेदी करणारे फिरते व्यापारी सुध्दा तेजीतच आहेत. शहरासह खेडेगावात दिवसभरात हे फिरते विक्रेते नित्याने विविध वस्तू डोक्यावर घेऊन पायी चालत, सायकल, मोटारसायकल किंवा चारचाकी वाहनाने घरोघरी फिरत असतात. सद्यःस्थितीत ऑनलाइन खरेदी व विक्रीला प्राधान्य दिले जात असताना, घराघरांसमोर येणारे फिरते विक्रेते विविध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल करतात. या फिरत्या विक्रेत्यांकडे जीवनावश्यक व कौटुंबिक आवश्यक व गरजेच्या जिन्नसांसह खाण्याचे पदार्थ सुध्दा उपलब्ध असतात. पिढ्यानपिढ्या फिरते विक्रीच्या व्यवसाय करणारे अनेकविक्रेते शहरासह खेडेपाड्यात नेहमीच आढळतात.
विशेषतः फिरते विक्रते नेहमी रोखीच्या व्यवहारात आर्थिक उलाढाल करताना दिसून येतात. यामध्ये प्लास्टिक बनावटीच्या वस्तू घरगुती जीवनाश्यक छोट्या मोठ्या वस्तू, कांदे, बटाटे विक्री, बिस्किट, बेकरीमधील वस्तु, किराणातील वस्तू, कपडे, चादरी विक्रीवाले, नित्याने घरोघरी फिरतात.यामध्ये परप्रांतातून आलेले व्यापारी यांचा प्रामुख्याने समावेश असतो.
..............................................
अनेक विक्रेते नवीन घ्या व जुने द्या या तत्त्वावर सुध्दा व्यवसाय साधत असतात. विविध प्लास्टिक वस्तूंच्या बदल्यात घरातील जुने कपडे देऊन त्याबदल्यात गृहिणींना नवीन वस्तूच्या अदलाबदलीचा व्यवहार सुध्दा होतो.
..............................................
खेडोपाडी स्वतःची ओळख
......................,.,................,
विशेषतः हा फिरते विक्रीचा व्यवसाय साधणारे अनेक व्यापारी हे परप्रांतातूनच आलेले दिसून येतात. एखाददुसरा स्थानिक विक्रेता हा व्यवसाय करताना आढळतो. अनेक वर्ष फिरते विक्रीच्या व्यवसाय करताना, प्रत्येक विक्रेते खेडोपाडी घराघरात व्यक्तिशः ओळख निर्माण करतात.त्यामुळे अद्यापही त्यांचे अस्तित्व राखून
एक आगळीवेगळी नाती या फिरते विक्रेत्यांनी गावागावातून निर्माण केली आहे. मात्र ऑनलाइन खरेदी विक्रीच्या जमान्यात सुध्दा हे खेडेपाड्यातून, गावागावातून घराघरात जाऊन विक्री व्यवसाय साधणारे फिरते विक्रेते अद्याप अस्तित्व राखून आहेत.
,..............................................
हे फिरते दुकानदार आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक उत्पन्न मिळवित असतात. याकरिता ते मोठ्या शहरातून विविध वस्तूंची खरेदी करून गावोगावी आणि घरोघरी जाऊन विक्री व्यवसाय करताना दिसतात अद्यापि खेड्यांमध्ये या फिरते विक्रेत्यांचा फारच बोलवाला असून, या फिरते विक्रेत्याकडून खरेदी करण्याचा कल ग्रामीण भागात नित्याने आढळतो. पावसाळा संपला की मे अखेरपर्यंत हे फिरते विक्रेते व्यवसाय करीत असतात.या व्यवसायातून ते घरोघरी आपले जिव्हाळ्याचे संबंध प्रस्तापित करताना दिसून येतात.
Comments