सोयाबीनच्या दराने बळीराजा झाला हवालदिल.
सोयाबीनच्या दराने बळीराजा झाला हवालदिल.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची केली
जाते लागवड.
भाव न वाढल्याने शेतकरी हवालदिल.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खडेश्वर तालुक्यामध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. तालुक्याच्या अनेक भागांमध्ये सोयाबीन लावण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल हा नेहमीच असतो. परंतु यावर्षी मात्र सोयाबीनच्या भावामध्ये तासातासाला होणाऱ्या चढउतारामुळे शेतकरी चागलाच हैराण झाला आहे.गेल्या वर्षी १० हजार २०० रुपयावर पोहचलेल्या सोयाबीनला यंदासाठी दर गाठताना चागलाच त्रास होत आहे.एकदा ६ हजार रुपये दर झाल्यावर पुन्हा वाढेल अशी शेतकऱ्यांना होती मात्र गेल्या काही दिवसापासून ५ हजार ते ५ हजार २०० रुपया पर्यंत दर घुटमळत आहेत त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या घरातच सोयाबीन अद्यापही पडूनच असल्याचे दिसून येत आहे.आता पाडव्याच्या मुहूर्ताच्या वेळी तरी दर वाढेल ? अश्या आशेवर शेतकरी अवलंबून आहे.नांदगाव खंडेश्वर
तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड दरवर्षी केली जाते. मुळातच बेभरवशाचा पाऊस तसेच सोयाबीनचा या तालुक्यात बियाण्यासाठीचा असलेला दर, मोलमजुरी आल्याशिवाय शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे • शिल्लक राहत नाहीत.
सोयाबीनची लागवड या भागामध्ये करण्यासाठी आणखी एक कारण असून, या पिकाला इतर पिकांसारखे तण व इतरांसाठी फार त्रासाचे काम नसून, पाऊस व हवामान हे या पिकासाठी योग्य आहे. यामुळे बहुतांश शेतकरी आता याच पिकाकडे वळले आहेत.
पाच वर्षांपूर्वीचा विचार केल्यास या पिकाला बाजारात असलेली किंमत फारच कमी प्रमाणात होती. त्यावेळी ३५०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीनचे भाव तीन वर्षांपूर्वी मात्र अचानक उसळी मारून ४८०० ते ४९०० पर्यंत पोहोचले होते. त्यावेळेपासून या परिसरामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. एकरी सर्वाधिक पिकामध्ये सोयाबीनच शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा सोयाबीनच्या पिकाकडे वळल्या आहेत शेतकऱ्यांच्या नजरा पिकाच्या दराकडे काढणीपासून लागलेल्या असतात यावर्षी सोयाबीन काढणीचा प्रारंभ झाल्यापासून त्यांचे भाव ५८०० रुपयापासून हेलकावे खात आहेत आता गेल्या काही दिवसापूर्वी सोयाबीनचे भाव हे ५२०० रुपयापर्यंत आले होते. सहाजिकच शेतकऱ्यांनी ६००० रुपये प्रतिक्विंटल मानसिकता करून या दरापर्यंत वाट पाहण्याची नियोजन केले होते.
बहुतांश वेळी पाडव्याच्या दिवशी फॅक्टऱ्यांकडून उच्चांकी दर काढला जातो. त्याचमुळे यावर्षी पाडव्याला ६००० हजारांचा दर निघेल, या अपेक्षेमध्ये अनेक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन घरातच ठेवले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा काही गावांमध्ये जाणाऱ्या व्यापाऱ्यांनी उठवला आहे. सोयाबीनच्या गेल्या सहा महिन्यांच्या चढ-उतारामुळे शेतकरी मात्र चागलाच हैराण झाला असून, अचानक उसळी व कमी होत शेतकरी गरजेपुरते सोयाबीन देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. घरगुती कारणासाठी जितक्या रकमेची आवश्यकता आहे, तितकेच सोयाबीन हा शेतकरी आता व्यापाऱ्यांकडे विक्रीस नेत असल्यामुळे दराबाबत शेतकऱ्यांमध्ये आलेली जागरूकता निश्चितच महत्त्वाची आहे.शेतकरी ६ हजार रुपये दराच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांना आता या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताची प्रतीक्षा असून, त्या दिवशी दरवाढ झाली नाही, तर मात्र शेतकन्यांना नाईलाजाने आहे त्या दरामध्ये सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही,हे मात्र नक्की.
Comments