अमरावती -भानखेड - मालखेड मार्गाची दयनीय अवस्था.

अमरावती -भानखेड - मालखेड मार्गाची दयनीय अवस्था.

लाखोंची उधळपट्टी होऊनही रस्ता खड्ड्यातच.

भ्रष्टाचाराच्या चौकशीची गावकऱ्यांची मागणी.

उत्तम ब्राम्हणवाडे 

अमरावती - भानखेड मार्गे मालखेड या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दरवर्षी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात मात्र रस्त्याची अवस्था कधीच बदलत नाही त्यामुळे या मार्गाच्या कामात भ्रष्टाचार तर होत नाही ना अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.
अमरावती छत्री तलाव मार्गे भानखेड ते मालखेड हे १७ किमी अंतर आहे या रस्त्यावर भानखेड ,मोगरा, हातला , कस्तुरा , लालखेड यात्रेकरिता संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले अवधूत महाराज देवस्थान यांचे सावंगा विठोबा व मालखेड अशी गावे येतात या सर्व गावांमधून शिक्षणासाठी विद्यार्थी अमरावतीला दुचाकी तसेच ऑटो ने ये जा करतात अमरावती ते पळसखेड या मार्गावर असलेल्या जि.प. शाळा, खाजगी शाळा, विद्यालय स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत तसेच आरोग्य विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची नियमित ये जा करतात शिवाय शेतकऱ्यांचा शेती माल व व्यापारी दृष्टीकोनातुनही या रस्त्यावरून वाहतूक होते असे असतांना देखील या रस्त्याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात आले आहे.
       या रस्त्यावर दरवर्षी डागडूगी करण्यात येते व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला जातो.खड्डे बुजविल्यानंतर ८ दिवसातच खड्यातील गिट्टी रस्त्यावर पसरते त्यामुळे अपघातही होतात व प्रसंगी जीव ही गमवावा लागतो लाखोची उधळपट्टी होत असतांना रस्त्याची अवस्था मात्र कधीच बदलत नाही. त्यामुळे या रस्त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे.

लालखेड - मालखेड रस्त्याची अवस्था वाळवंटा सारखी
 "दुचाकीने जात असताना रस्त्यावरील एक गड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकी चार गड्ड्यातून जाते प्रसंगी स्त्यावरील धूळ इतकी उडते की वाळवंटात गाडी चालवण्याचा अनुभव हा लालखेड मालखेड रस्ता आम्हाला देतो या रस्त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढल्याने जनप्रतिनिधींनी यांकडे आवर्जून लक्ष द्यावे.
अजिंक्य फुसे.(मालखेड रेल्वे)

या रस्त्यामुळे यात्रेकरूना होणार नाहक मनस्ताप 
"संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले अवधूत महाराज देवस्थान यांचे सावंगा विठोबा येथे गुढीपाडव्याला प्रचंड यात्रा भरते यावेळी मालखेड वरून रेल्वेने मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू मालखेड लालखेड मार्गे ये जा करतात वर्दळ वाढते त्यामुळे रस्त्याची अवस्था बघता अपघाताचे प्रमाणही वाढेल त्यामुळे संबधित विभागाने जीवहानी ची वाट न बघता तात्काळ रस्ता दुरुस्त करावा"

  सुरज अंबाडकर.(मालखेड रेल्वे)

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात