शहीदांना अभिप्रेत असलेला भारत घडविण्यास सज्ज व्हा- कॉ.विकी महेसरी

शहीदांना अभिप्रेत असलेला भारत घडविण्यास सज्ज व्हा- कॉ.विकी महेसरी

एआयएसएफचे राष्ट्रीय सचिव कॉ.विकी महेसरी यांचे युवकांना आवाहन.
 
उत्तम ब्राम्हणवाडे.

    शहीद कॉम्रेड भगतसिंग , सुखदेव , राजगुरु यांनी ज्या ध्येयपूर्ति साठी आपल्या प्राणाचे बलीदान दिले ती ध्येयपूर्ती व त्यांचा विचाराचा भारत आजही आपण घडवू शकलो नाही त्यामूळे शहीदांना अभिप्रेत असलेला भारत घडविण्यासाठी युवकांनी संघर्षसाठी सज्ज होण्याचे आवाहन ऑल इंडिया स्टूडंट्स फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव कॉ . विकी महेसरी यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी (रसुलापूर)येथे केले.ते एआयएसएफ , एआयवायएफ व महिला फेडरेशने शहीद दिना निमित्य आयोजित केलेल्या "एक शाम शहीदों के नाम " कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते . केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे शेतकरी , मजुर ,कामगार , विदयार्थी ,युवक , अल्पसंख्याक ,महिला ,आदीवासी सह सर्व जनविभाग गंभीर आर्थिक संकटाला सामना करीत आहे . शेतकऱ्यांनी तीन कृषी कायदयाच्या विरोधात ऐतिहासिक संघर्ष करून अन्नधान्य व शेतजमीन अदाणी , अंबाणी या भांडवलदारांना देण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडला आहे . मोदी सरकारचे नवे शैक्षणिक धोरण म्हणजे सर्वसामान्यांना शिक्षणापासून वंचीत करण्याचे ब्राम्हणी षडयंत्र आहे .नवीन कामगार कायदयाद्वारे कामगारांचे जीवन उद्धवस्त करण्याचे काम या सरकारने केले आहे . बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली आहे . वाढत्या महागाईमुळे जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे . गेल्या ७० वर्षात महत्प्रयासाने भारतीयांनी आपल्या घामातून उभारलेल्या सर्व सार्वजनिक क्षेत्राचे मोदी सरकारने खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे . बँक ,विमा , रेल्वे , विमान , पेट्रोलियम कंपण्या , कोल इंडिया , विज , स्टिल , इत्यादी सार्वजनिक उद्योग अदाणी अंबाणी या भांडवलदाराचा घश्यात घालण्याचे काम जोरदारपणे सुरु आहे . या धोरणा विरोधात विद्यार्थी , युवकांसहीत सामान्य जनतेने तीव्र जनसंघर्ष उभा केला तरच या फॅसिस्टn धर्मांध मोदी सरकारचा पराभव करणे शक्य आहे . समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी भारतीय समाजाची निर्मिती व ब्राम्हण्यशाही , भांडवलशाहीचा पराभव करण्यासाठी शहीदांचे विचार आपल्याला मार्ग दाखवित असल्याचे मत ए आय एस एफ चे राज्यध्यक्ष कॉ. विराज देवांग यांनी मांडले .
यावेळी एल्गार सांस्कृतिक मंच मुंबईचे धम्मरक्षीत रणदिवे व त्यांच्या साथीदारांनी" एक शाम शहीदों के नाम" या जोशपूर्ण क्रांतिगितांचा कार्यक्रम सादर केला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. धीरज बनकर हे होते .प्रास्ताविक कॉ . वेदिका मरगडे यांनी तर संचालक कॉ प्रतिक्षा ढोके यांनी केले . कार्यक्रमाला भाकपचे राष्ट्रीय कौंसिल सदस्य कॉ . तुकाराम भस्मे , पक्षाचे जिल्हा सचीव कॉ . सुनिल मेटकर , तालुका सचिव कॉ . संतोष सुरजुसे ,अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य कॉ . प्रा . कैलास चव्हाण , एआयएसएफ चे जिल्हा सचिव कॉ . योगेश चव्हाण , महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव कॉ . चित्रा वंजारी ,कॉ . निळकंठ ढोके दिलीप तायडे , चैतन्य कलाणे यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद तरेकर , माधव ढोके , विनोद वैद्य , मोरेश्वर वंजारी , अमोल राजकुळे ,लिलेश्वर आगळे ,उमेश मंदुरकर ,उमेश तरेकर ,अंकुश वैदय ,प्रज्वल ढोके , यश वैदय ,वेदीका मरगडे ,अमित बोरकर , प्रतिक्षा ढोके , पायल राजकुळे , चेतन वैदय , श्वास्वत आगळे , यश वैरागळे ,सचिन धुमनखेडे , जुगल वैदय ,अक्षय मंदुरकर , कार्तिक राजकुळे , सौरव राजकुळे ,कार्तिक घुगुसकार ,सनय चोपकर, सिध्दार्थ तरेकर , उमेश बावनकुरे , विकास दादरवाडे , पवन लांजेवार , स्वप्नील लांजेवार , अभिनव ढोके ,हर्षल भोयर , ओम कळंबे अभिजित कळंबे ,आकाश दादरवाडे रोशन वैद्य , नैतिक कळंबे , संघर्ष वैद्य , क्रांती वैद्य ,मनु ढोके , आर्यन वंजारी ,आयुष भस्मे , शाम आगळे ,प्रथमेश मरगडे ,ओवी तरेकर , सिद्धू वैदय इत्यादींनी प्रयत्न केले.

Comments

Anonymous said…
कार्यक्रम खुप छान झाला . शिवणीकरांचे अभिनंदन . कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी दिल्याबद्द्ल आपणास धन्यवाद .

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात