आठवडी बाजारातील व्यापार्याकडून होत आहे ग्राहकांची फसवणूक.

आठवडी बाजारातील व्यापार्याकडून होत आहे ग्राहकांची फसवणूक.

गावखेड्यातील सर्वसामान्याची सर्रास लूट.

वैधमापनशास्त्र निरीक्षकांच्या बाजारांना भेटी आवश्यक.

उत्तम ब्राम्हणवाडे 

नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात
नियमित भरणाऱ्या आठवडी बाजारातून अप्रमाणित वजन काटे, वजन मापे यांच्या माध्यमातून ग्राहक वर्गाची सर्रास लूट होत असल्याचे समोर येत आहे. ती थांबवण्यासाठी शासकीय वैधमापनशास्त्र निरीक्षकांनी नांदगाव खडेश्वर शहरासह तालुक्यातील आठवडी बाजारांना आकस्मिक भेटी देऊन अप्रमाणित वजन काटे, वजन मापे धारकांवर कायदेशीर कारवाई करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापनशास्त्र यंत्रणेमार्फत वैधमापनशास्त्र अधिनियम व महाराष्ट्र वैधमापनशास्त्र अंमलबजावणी नियमानुसार वैधमापनशास्त्र निरीक्षक पडताळणी शुल्क आकारून वजन काटे, मापे, लोखंडी वजने यांची वार्षिक तपासणी व पडताळणी करून त्यांचे प्रमाणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देतात. त्यासाठी तालुकास्तरावर कॅम्पही आयोजित केले जातात. परंतु  नांदगाव खंडेश्वर शहरासह ग्रामीण भागातील गावोगावी आठवडी बाजारात फिरणारे सर्वच व्यापारी इलेक्ट्रॉनिक काटे, वजन मापे दरवर्षी तपासणी प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी प्रमाणपत्र नूतनीकरण करून घेतातच असे नाही.साहजिकच आठवडी बाजारातून  अशी तपासणी व पडताळणी कालबाह्य झालेली परिमाणे वापरत असल्याचे दिसून येते.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वच निमशहरी गावातून व जादा लोकवस्तीच्या गावातून आठवड्यातील ठराविक दिवशी साप्ताहिक अथवा आठवड्यातून दोन दिवस बाजार भरतो. अशा बाजारात पंचक्रोशीतील लहान खेड्यातील, वाड्या वस्त्यावरील शेतकरीवर्ग विशेषतः महिलावर्ग पुढील आठवडाभर पुरतील एवढ्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नियमितपणे हजेरी लावतात. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, तांदूळ, गहू, विविध डाळी, मसाल्याचे पदार्थ, गूळ, गोडेतेल भाजीपाला या पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांच्या वजन मापासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काटे, लोखंडी काटे पारडे व वजने यांचा वापर होतो.
परंतु काही व्यापाऱ्यांकडे वैधमापनशास्त्र निरीक्षकाकडून तपासणी व पडताळणी न केल्याची, मुदत संपलेले काटे मापे वापरात असल्याचे दिसून येते. अशा व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या मालाच्या वजन मापात फरक येत असल्याचे सजग नागरिकांच्या लक्षात येते.   परंतु ग्रामीण भागात अशिक्षित महिलांची आणि नागरिकाची फसवणूक हे व्यापरिबकरीत असल्याचे दिसून येते.आणि यामुळेच त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे.ही फसवणूक टाळण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आठवडी बाजाराना नियमित भेटी देऊन व्यापाऱ्यांच्या वजन व मापांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
..............................................
 गावातील बाजारातून फसवणुकीची शक्यता अधिक.
.............................................
तालुक्याच्या सीमावर्ती गावातील आठवडी बाजारात नजीकच्या तालुक्यातील बरेचसे व्यापारी माल विक्रीसाठी येतात. अशा व्यापार्यांच्या मोजमापांची पडताळणी त्या तालुक्यातील कायद्यानुसार होत असल्याने ती झाली आहे किंवा नाही याबाबत संदिग्धता दिसून येते. त्यामुळे अशास्थितीत ग्राहकांच्या फसवणुकीची शक्यता मोठ्या प्रमानात दिसून येत आहे. याकडे वेळीच शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !