श्री खंडेश्वर संस्थांनवर अखेर प्रशासकराज ...

एस.एन.पठाण यांची प्रशासक पदी नियुक्ती 

संयुक्त धर्मदाय आयोगाचे आदेश धडकले.

उत्तम ब्राम्हणवाडे

संपूर्ण तालुकावासीयांचे दैवत असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील 850 वर्षे पुरातन अशा श्री खंडेश्वर देवस्थानवर अखेर संयुक्त धर्मदाय आयुक्त अमरावती यांनी प्रशासकाची नियुक्ती केली आहे तत्संबंधीचे आदेश नुकतेच येथे धडकले असून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या  विश्वस्तांच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.

 गेल्या काही दिवसांपूर्वी नांदगाव खंडेश्वर येथील श्री.खंडेश्वर संस्थांनवर संयुक्त धर्मदाय आयुक्त अमरावती यांनी एस.एन.पठाण यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली होती तसेच पठाण यांना   संस्थांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल देण्याचे सुद्धा निर्देश दिले होते त्यावरून निरीक्षक पठाण यांनी आपला अहवाल अमरावती येथील संयुक्त धर्मदाय आयुक्त संभाजी ठाकरे यांना सादर केल्यावर संपूर्ण चौकशीअंती आयुक्त ठाकरे यांनी  या संस्थांनवर प्रशासक बसविण्याची कारवाई केलेली असून तत्संबंधीचे आदेश सुद्धा येथे धडकले आहेत त्यामुळे या संस्थांनमध्ये कार्यरत असलेल्या विश्वस्थाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे.


या संस्थांनमध्ये पूर्वीच्या आणि संद्याच्या विश्वस्त यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दिवसेंदिवस झडत आहेत. नांदगाव खंडेश्वर येथील श्री. खंडेश्वर संस्थांनवर प्रशासक बसविण्याबाबतचे आदेश दिनांक 23/ 2/ 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत.यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.




Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात