कंझरा येथे कृषी अधिकाऱ्यांची भेट.
कंझरा येथे कृषी अधिकाऱ्यांची भेट.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कंझरा येथील अमोल फुटाणे यांनी नावीन्यपूर्ण अशा चिया सीड्स या पिकाची लागवड केली. या पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी खर्चान तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे व मंडळ कृषी अधिकारी . वानखडे यांनी भेट दिली. भेटी दरम्यान चिया सीड्स ची पाहणी करून प्रक्षेत्र भेटीत उपस्थित शेतकऱ्यांची सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच रत्नाकर फुटाणे यांनी चिया सीड्स च्या लागवडीबाबत माहिती सांगितली व त्याच्या उपयोगाबाबत चर्चा करण्यात आली.
त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी किशोर पराते यांच्या शेतातील मलचींग वर लागवड केलेल्या टरबूज व इतर भाजीपाला पिकाची पाहणी केली व मार्गदर्शन केले. तसेच गावातील जेष्ठ शेतकरी . जगन्नाथ सोनकुसरे हे रान डुक्कराच्या हल्यात जखमी झाले होते, त्यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील आत्मा प्रतिनिधी प्रेरणा डफळे, कृषिसाहायक आश्विनी वानखडे, कृषी मित्र कुंदन बडगे, रईस शेख, नरेंद्र सोळंके, प्रवीण मोरे, किशोर पराते, दिनेश मोरे, मनोज सोनकुसरे, सचिन घेवारे, राहुल हेडाऊ इ. गावातील शेतकरी उपस्थित होते.
Comments