नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गहू काढणीची लगबग सुरू.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गहू काढणीची लगबग सुरू.
हार्वेस्टर यत्राला शेतकऱ्यांची पसंती.
हरभऱ्याने केली निराशा
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वच भागात गहू काढणी व मळणीला शेतकऱ्याकडून सुरुवात झाली आहे पारंपारिक पद्धतीने गहू काढत हार्वेस्टर मशीनद्वारे काढणीला वेग आला आहे यावर्षी शेतात काम करणाऱ्या मजुरांची संख्या घटल्याने हाताने गहू काढणे जवळपास बंद झाले आहे त्यामुळे कमी वेळेत आणि कमी कष्टात हार्वेस्टर यंत्राने गव्हाची काढणी करताना शेतकरी दिसत आहेत या परिसरात गव्हाचे पीक जोरदार आल्याने उत्पन्न वाढीची आशा शेतकऱ्यांना आहे. तालुक्यातील शिवनी (रसूलापुर) मंगरूळ (चव्हाळा) वेणी (गणेशपुर) सालोड, पिंपळगाव( निपाणी ) धानोरा (गुरव) वाढोना ( रामनाथ ) शिरपूर, धामक,येवती,माहुली (चोर) पळसमंडळ, पापळ,चांदसुरा,दाभा, यासह अनेक भागात शेकडो एकरातील गव्हाची काढणी मशीनद्वारे सुरू झाली असून शेतकरी शेतात राबताना दिसत आहेत यावर्षी वाढलेली थंडी गव्हाला फायदेशीर ठरल्याने तसेच तालुक्यात मुबलक पाणी आणि गव्हाला मिळालेले पोषक वातावरण यामुळे या परिसरात गव्हाचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे गव्हाच्या उत्पन्नात दरवर्षीपेक्षा यावर्षी तालुक्यात वाढ होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. या भागात सुरुवातीला खळ्याद्वारे गव्हाची मळणी केली जात असे यानंतर थ्रेशर आणि आता हार्वेस्टर या यंत्राद्वारे गव्हाची काढणी आणि मळणी केली जात आहे गहू आणि हरभरा या रब्बी हंगामातील पिकाबरोबर या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाळी बागायती पिकाची लागवड करण्यात आली आहे खरिपाचा हंगाम संपताच शेतकऱ्यांनी लगेच या ठिकाणी गव्हाचे पीक घेतल्याने दुहेरी फायदा शेतकऱ्यांना मिळाला आहे मार्च महिना सुरू होताच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे गहू काढनी योग्य झाल्याने शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा वापर करताना दिसत आहे पंजाब आणि हरियाणा या राज्यातून यंत्र चालक या भागात दाखल झालेले आहेत शेकडे हार्वेस्टर यंत्राद्वारे हजारो हेक्टर मध्ये गव्हाची काढणी मार्च अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने ही यंत्र चालक शेतकऱ्याकडून प्रति एकर १५०० रुपये घेत आहेत यंत्रामुळे वेळेची बचतसुद्धा होत असून शेतकऱ्यांना उन्हाळी पीकही घेता येणार आहेत. ....................................................................
रब्बी हंगामात गहू,हरभरा या पिकापासून आपल्याला चांगले उत्पादन मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक व्यवहाराचे नियोजन केल्याचे दिसत होते परंतु निसर्ग बदलामुळे हरभरा पिकावर फुले आणि फळ धारण करण्याच्या अवस्थेत तीन ते चार दिवस या परिसरात मोठे धूके निर्माण झाले होते त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना हरभऱ्यापासून एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही. ......................................................................
हरभऱ्याचा उतारा एकरी तीन ते चार क्विंटल आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे वर्षभराचा आपल्या आर्थिक व्यवहाराचा ताळमेळ कसा साधावा देणेकऱ्याचे देणे कसे द्यावे या विवंचनेत शेतकरी आहे तर काही शेतकऱ्याकडे चालू रब्बी हंगामामध्ये आपल्या कुटुंबासाठी वर्षभर खाण्याकरिता लागणाऱ्या गहू पिकाची पेरणी केली होती त्या गहू पिकापासून प्रति एकरी 15 ते 20 क्विंटल उतारा मिळत असल्याने बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडून समाधान व्यक्त केले जात आहे.
......................................................................
Comments