धान्य बंद करून जनतेला उपाशी मारण्याचा निर्णय रद्द करा!

धान्य बंद करून जनतेला उपाशी मारण्याचा निर्णय रद्द करा!

माकप तालुका सचिव श्याम शिंदे याची मागणी.


उत्तम ब्राम्हणवाडे 

केंद्र व राज्य सरकारांनी धान्यांच्या ऐवजी खात्यावर पैसे जमा करण्याचा जण विरोधी निर्णय घेतला आहे, त्याचा विरोध करण्यात यावा अशी भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदगाव खंडेश्वर तालुका सचिव श्याम शिंदे यांनी केली आहेत. आधीच जनता महागाईमुळे परेशान आहे, त्यातच सरकार धान्य बंद करून जनतेला उपाशी मारण्याचे काम करत आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे अन्न दान करण्याची, बळीराज्याची परंतु सरकार आज  अन्न बंद करून सर्वाना महागाई मध्ये उपाशी ठेवण्याचे काम करत आहे.


     सुरवातीला गॅसची सबसिडी बंद करून खात्यावर सबसीडी देण्याचे नाटक काही दिवस केले आता पुर्ण सबसीडी बंद करून गॅस च्या कींमती वाढवण्याचे काम सरकारने केले आहे, तसेच रेशन च्या बाबतीत सरकार सबसीडी देण्याचे नाटक करून धान्य देणे बंद करत आहे, आज आपल्या महाराष्ट्रात भुमीहीन व कोरड वाहू ६० % पेक्षा जास्त जनता आहे,   विदर्भ हा विभाग दुष्काळी आहे, आधिच निसर्गाच्या लहरीपणा मुळे येथील शेतकरी आत्महत्या करीत आहे.

मजुर वर्ग शहरात, वाडी वस्तीत, खेड्यात राहातो त्याच्या हाताला नियमीत काम मिळत नाही, हाताला काम नसल्याने धान्य विकत घेण्याची ऐपत त्यांच्यात नसल्याने कुपोषण वाढत आहे, कुपोषण थांबवण्यासाठी सरकारने रेशन धारक कुटुंबांना खात्यावर अनुदान जमा करण्याऐवजी दरमहा ३५कीलो धान्य वाटप करावे. तरच गरीब मानस जिवंत राहातील, धान्य बंद करून जनतेला ठार मारण्याचा कट सरकारने रचला आहे, त्याचा निषेध करावा तेव्हढा थोडाच आहे.


Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात