महावितरण उपविभागीय कार्यालयातील उपअभियंता पद्माकर पाटील व अभियंताची अरेरावी

सर्वच अधिकारी करतात अपडाऊन 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी 

उत्तम ब्राम्हणवाडे

नांदगाव खंडेश्वर येथील  महावितरण कंपनीचे उपअभियंता पद्माकर पाटील व इतर अभियंते हे सर्वच जण अमरावती येथून नांदगाव खंडेश्वर येथे आणि तालुक्यात जेथे त्यांची ड्युटी आहे त्या ठिकाणी सोबतच  या विभागाच्या गाडीमध्ये ये - जा करतात त्यामुळे शाखा कार्यालयातील अभियंता व सोबत येणाऱ्या कर्मचाऱ्याना उपअभियंता हे पाठीशी घालत असल्याचे दिसते त्यामुळेच सर्व अधिकारी  रजेवर आणि फक्त महिला कर्मचारी कार्यालयात ड्युटीवर हजर असल्याचे दिसते महावितरण कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथील कोणतेही  अधिकारी हे विजग्राहकांशी व्यवस्थित बोलत नसल्याने यांच्याविषयी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसून येतो  तालुक्यातील काही भागातील कृषी ग्राहकांचे रोहित्र बंद पडलेले असताना शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान होते आहे.


त्यामुळे सर्व शेतकरी बांधव हे लोकप्रतिनिधी सह उपविभागीय आणि शहर शाखा कार्यालयात गेले असता संबंधित ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता यांना रोहित्र बंद असल्याचे सांगितल्यावर मला माहिती नसल्याचे  कनिष्ठ अभियंता हे अत्यंत उडवाउडवीची उत्तर देतात रोहित्र कधी येणार असल्याचे विचारल्यास माहीत नाही असे उद्धटपणे सांगितले जाते व शेतकऱ्यांना धीर न देता त्याच्या अडचणी न सोडवता त्याच्या अडचणी आणखीच वाढवतात व त्यामुळे शेतकऱ्यांना उपविभागाकडे धाव घ्यावी लागते  आणि महावितरण उपविभागीय कार्यालयात गेले असता उपविभागीय अधिकारी पद्माकर पाटील हे सुद्धा शेतकऱ्याचं समाधान करीत नसल्याचे दिसते व उडवा उडवीचे उत्तर ते देतात.


त्यांना फोन केला असता माझ्या पर्सनल फोनवर कॉल करायचा नाही ऑफीसच्या मोबाईलवर कॉल करा असे उद्धटपणे सांगतात आणि ऑफिसच्या मोबाईलवर कॉल केल्यास त्यांना कधीच कॉल लागत नाही त्यामुळे बऱ्याचदा उपविभागीय कार्यालयात व शाखा कार्यालयात अभियंता हजर नसल्याने ग्राहकांची गैरसोय होते व विजग्राहकांना निराश होऊन परत जावे लागते  काही संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हजर नसल्याने विजग्राहकांची कामे होत नाही त्यामुळे याकडे मुख्य अभियंता अमरावती यांना उपअभियंता पाटील सहित त्यांचे सर्व अभियंता यांच्यावर अंकुश लावावा व विजग्राहकांशी तसेच कृषिग्राहकांशी व्यवस्थित बोलावे व त्याच्या तक्रारींचे निवारण वेळेत होईल याची काळजी घ्यावी तसेच रोहित्र बिघाड झाल्यास ताबडतोब बद्दलविण्याची कार्यवाही करण्यात येण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात तीव्र जनआक्रोश होऊन त्यांना लोकप्रितिनिधी व जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल यात तिळमात्र शंका नाही!



Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात