अंजनगाव बारी येथील शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित.

अंजनगाव बारी येथील शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित.

【कृषी विभागाचा गोंधळ कारभार,शेतकरी हवालदिल,शेतकरी आर्थिक लाभांपासून वंचित 】

उत्तम ब्राम्हणवाडे 

केंद्राकडून (दि २७ मार्च) रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २ हजार रुपयाचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांना खात्यात टाकण्यात आला. या योजनेनुसार हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते .,मात्र
महसुल विभागाकडून ही योजना आता केंद्राने कृषी विभागाकडे हस्तांतरित केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात 
आली आहे.यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन,योजनेच्या आर्थिक लाभांपासून शेतकऱ्याना वंचित रहावे लागले असुन शेतकऱ्यांना बँकेच्या येरझाऱ्या माराव्या लागत आहे.
          केंद्राच्या या योजनेसाठी शेतकऱ्यांनी केवायसी प्रोसेस पुर्ण केले पण तरीही या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे.यासाठी आमच्या प्रतिनिधिने कृषी विभागाशी विचारणा केल्या असता कुठलेही ठोस कारण न दिल्याने व टाळाटाळीचे उत्तरे देण्यात येतात., त्यामुळे हि योजना नेमकी आहे तर कुठल्या खात्याची,त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण आल्यास विचारणा कोठे करावी हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होऊन त्यांना संभ्रामात टाकणारा आहे.अंजनगाव बारी येथील कृषी सहाय्यकाशी विचारणा केली असता त्यांनी वरिष्ठांशी विचारुन लाभ का मिळाला नाही याची विचारणा करणार असल्याचे समर्पक उत्तर देऊन मोकळे झाले.
या योजनेमार्फत सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळवा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.

 योजना कृषी विभागाची :-
 पंतप्रधान किसान योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या देण्यास महसूल किंवा कृषी विभाग तयार नाही.योजना कृषी विभागाची असल्यामुळे कृषी विभागाकडून याची माहिती मिळू शकेल,असे महसूल विभाग सांगत आहे.कृषी विभाग मात्र याची जबाबदारी महसूल विभागावर टाकत असल्याने जबाबदारी ढकलत आहे. त्यामुळे बळीराजा यामध्ये पिसल्या जात आहे.त्यामुळे नेमकी योजना कोणाकडे आहे या संभ्रमात शेतकरी वर्ग पडला आहे.

【 शेतकऱ्यांना आतापर्यंत मागेपुढे का होईना १२ हप्त्यांचे पैसे खात्यात जमा झाले त्यासाठी त्यांनी आपल्या खात्याच्या मोबाईल नंबर जोडून केवायसी प्रोसेस पुर्ण केली पण काही शेतकऱ्यांनी हि प्रोसेस केली नसुनही हा लाभ मिळाला, पण काही नियमीत शेतकऱ्यांना यापासून वंचित राहील्याची धक्कादायक माहिती अंजनगाव बारी येथील शेतकऱ्यांना दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यासाठी दाद मागायला आता कोणाकडे जावे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.!】

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात