पिसाळलेल्या कुत्रीचा पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला.

पिसाळलेल्या कुत्रीचा पिता-पुत्रावर प्राणघातक हल्ला

टिमटाळा येथील घटना 

मुलाला वाचविण्यासाठी पित्याचे थरारक धाडस


उत्तम ब्राम्हणवाडे 

  नांदगाव खंडेश्वर तालुक्याअंतर्गत येणा-या टिमटाळा येथील एका पिसाळलेल्या कुत्रीने पिता-पुत्राला प्राणघातक चावा घेत गंभीर जखमी केले असून दोघांवरही जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे उपचार सुरु आहे. 

सविस्तर वृत्त असे की, टिमटाळा येथील रहिवासी श्रीपाल सहारे हे नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेल्या बक-या घरासमोरील अंगणात बांधत होते, तेवढ्यात रात्रीच्या अंधारात लपून बसलेल्या पिसाळलेल्या कुत्रीने जवळच असलेल्या पिलाला चावा घेत त्याला तोंडात घेऊन पळ काढला. सहारे यांनी आरडाओरड करून कुत्रीचा पाठलाग केला. बक-या बांधण्यासाठी गेलेल्या आपल्या पित्याचा आवाज ऐकून घरामध्ये आराम करित असलेल्या सुरज सहारे यांनी लगेच कशाचेही भान न ठेवता आपल्या पित्याच्या आवाजाचा दिशेने सुसाट धावत सुटला. पित्याच्या पुर्वीच सुरज हा कुत्रीचा समोर पोहचल्याने पिसाळलेल्या कुत्रीने तिच्या तोंडातील पिल्लाला सोडून सुरजकडे धाव घेत चावा घेण्याची सुरूवात केली. चावा एवढा प्राणघातक होता की कुत्रीने त्याला दोन-तीन फुट फरफटत नेले. आपल्या मुलाला पिसाळलेली कुत्री सोडत नसल्याचे पाहून श्रीपाल सहारे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कुत्रीच्या जबड्यात हात टाकून आपल्या मुलाचा पाय कुत्रीच्या तोंडातून सोडवला खरा पण पिसाळलेली कुत्री आपल्या वडिलांना चावा घेत असल्याचे पाहुन सुरजने अंधारात चाचपळत जवळच असलेला दगड मारून कुत्रीला आपल्या वडीलांपासून वेगळे केले. दोघांचीही आरडाओरड करून गावक-यांनी धाव घेतली.

दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने त्वरित टिमटाळा येथे संवेदना रूग्णालयात अहोरात्र सेवा देणा-या रुग्णवाहिकेतून तातडीने अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवरही उपचार करून त्यांची मलमपट्टी करण्यात आली. मात्र सुरज सहारे याला हातापायाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असल्याने  त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर डॅाग बाईट चे उपचार सुरु आहेत. कुत्रीचा जबड्यात हात टाकून आपल्या जिवाची‌ पर्वा न करता आपल्या मुलाला सोडवण्यासाठी केलेल्या धाडसाची आणि तातडीने गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्राला जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचवण्या-या टिमटाळा येथील संवेदना रूग्णालयाच्या रुग्णवाहिकेची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

Comments

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !