गावातील लेकींच्या योगदानातुन मंदिरावर कळसारोहन.
गावातील लेकींच्या योगदानातुन मंदिरावर कळसारोहन.
तब्बल २२० लेकींनी घेतला सहभाग.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर झाले कलश्यारोहन.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली (चोर) येथील पुरातन असलेल्या विट्ठल रुख्मनी मंदिरावर दि.१९ रोजी कळस बसविण्यात आला. हा कळस बसविण्याचा सर्व खर्च गावातील विवाहित आणि अविवाहित लेकींनी केला हे उल्लेखनीय !
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली (चोर) येथे विट्ठल रुख्मनीचे अत्यंत पुरातन असे मंदिर आहे.या मंदिरात दरवर्षी भागवत साप्ताह होतो.मागील वर्षी या मंदिराचा गावकर्यानी लोकवर्गणीतून जीर्णोद्धार केला आणि या वर्षी मंदिरावर कळस बसविण्याचे ठरविले होते.कळस बसविण्या करिता गावातील विवाहित लेकींनीच योगदान द्यावे असे आवाहन ह.भ.प.शिवाजी महाराज मानकर यांनी मागील वर्षी झालेल्या किर्तनातून केले होते.त्यामुळे त्यांच्या या आवाहनाला गावातील लेकिनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत तब्बल २२० लेकींनीआपआपल्या परीने याकरिता योगदान दिले.आणि मंदिरावर
या कळसरोहनाचा एक आगळा वेगळा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासोबतच दिनांक १२ ते 19 दरम्यान भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता यामध्ये ह.भ.प. सुरज महाराज पोहोकर यांनी श्रोत्यांना भागवत कथा ऐकवली तसेच . ह.भ.प. संकेत महाराज जोगे, ह.भ.प. देवानंद महाराज प्रघने, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भालनिलक, ह.भ.प. अतुल महाराज बोरडे, ह.भ.प. गोवर्धन महाराज खिरकर , ह.भ.प. विष्णू महाराज गावंडे यांनी किर्तन सेवा दिली,या वेळी कलसाकरिता योगदान देणाऱ्या सर्वच लेकींचा सन्मानसुद्धा करण्यात आला.तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
Comments