कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची फसवणूक करणाऱ्यांना साथ
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची फसवणूक करणाऱ्यांना साथ
शेतकऱ्याचे सोयाबीनचे पैसे देण्यास व्यापाऱ्याची टाळाटाळ
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी (रसुलापुर) येथील शेतकरी विनोद गोंडाने यांनी कारंजा बाजार समितीत एक वर्षांपूर्वी विकलेल्या सोयाबीनचे पैसे देण्यास येथील नवदुर्गा ट्रेडर्स व दर्शनी ट्रेडर्सचे संचालक टाळाटाळ करीत आहेत. विनोद गोंडाणे यांनी कारंजा लाड बाजार समितीत त्यांच्या सोयाबीन मालाची रक्कम मिळण्यासाठी अनेक वेळा चकरा मारल्या; मात्र सदर व्यापाऱ्यांनी अनेक वेळा भुलथापा देऊन सदर शेतकऱ्यांचे 92 हजार रुपये अद्यापही दिले नाही. याप्रकरणी बाजार समितीचे सचिव निलू भाकरे यांना प्रत्यक्ष भेटून व संघटनेतर्फे निवेदनाद्वारे चर्चा करून न्याय मागितला. शिवणी रसुलापुर येथील उपसरपंच तथा शेतकरी विनोद नामदेवराव गोंडाणे व नांदगाव खंडेश्व तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी कारंजा बाजार समिती मध्ये फसवणूक झालेली आहे.
कारंजा बाजार समिती अंतर्गत नवदुर्गा ट्रेडर्स व दर्शनी ट्रेडर्स व इतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन मालाच्या विक्रीचे पैसे न दिल्याने व सचिवांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे बेमुदत उपोषण व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 14/2/2022 रोजी नवदुर्गा टेडर्स व दर्शनी ट्रेडर्स यांना 191150 रुपये किमतीचा सोयाबीनचा माल विकला आहे. त्यापैकी 92 हजार रुपये रक्कम गोंडाणे यांना अद्यापही प्राप्त झाली नाही. याबाबत बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांना अनेक वेळा तक्रारी व विनंती अर्ज सादर केले मात्र त्यांनी सदर व्यापाऱ्यांवर वसुलीची कारवाई न करता प्रकरण गुंतागुंतीचे केले. याबाबत न्याय न मिळाल्याने या प्रकरणाची तक्रार निवेदनाद्वारे तहसीलदार व ठाणेदार कारंजा लाड यांना देण्यात आली आहे.
याबाबतची तपशीलवार तक्रार बाजार समितीचे सचिव भाकरे यांना ६/५/२०२२ रोजी सादर केलेली होती. मात्र त्या तक्रारीची दखल न घेता आपण कोणतीही कारवाई त्यांनी केली नाही.
याबाबत बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांना विनोद गोंडाने व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात अनेक वेळा येऊन तोंडी व लेखी तक्रार सादर केली.याबाबत सचिवाने संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध कारवाई करतो व त्याची अनामत व सातबारा वरील बोजा ग्राह्य धरून वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करतो असे आपण आश्वासन दिले होते.
अनेक वेळा आश्वासन दिल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून शांतपणे गोंडाणे व इतरांना न्याय मिळेल यासाठी प्रतीक्षा करीत राहिले. मात्र सचिवांनी याबाबत कोणतीही कारवाई न करता गोंडाणे यांची तक्रार ही २५/५/२०२२ रोजी निकाली काढली आहे असे त्यांना पत्र दिले. संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध बाजार समितीच्या प्रचलित नियमानुसार सचिवांनी कोणतीही कारवाई न करता पोलिसांमध्ये देखील तक्रार दाखल केली नाही. यावरून बाजार समितीचे सचिव भाकरे हे संबंधित व्यापाऱ्यांना पाठीशी घालत आहात हे सिद्ध होते. असे निवेदनात नमूद केले आहे. आमचे घामाचे व मेहनतीचे पैसे संबंधित व्यापारी अडत्यांनी हडप केलेले असताना सचिवांनी एक वर्षेपर्यंत गोंडाणे यांना केवळ झुलवत ठेवले व उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत.
कारंजा बाजार समिती ही शंभर वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेली आपली बाजार समिती आहे.या बाजार समितीत येणारे शेतकरी हे कोणत्याही अडते किंवा व्यापाऱ्याकडे बघून येत नसून बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर माल घेऊन आपल्या बाजार समितीत येत असतात. नवदुर्गा ट्रेडर्स हा बाजार समितीचा खरीदार व लायसनधारक अडत्या आहे; मात्र दर्शनी ट्रेडर्स चा बाळू गावंडे हा तोतया अडत्या नवदुर्गा ट्रेडर्स मार्फत बाजार समितीत खरेदी करत होता. फसवणूक करणारा व लायसन रद्द झालेला बाळू गावंडे हा कोणाच्या आशीर्वादाने बाजार समितीत खरेदी करत होता व बोली बोलत होता?तो बाजार समितीत शिरला कसा?व तो शेतकऱ्यांची फसवणूक कोणाच्या आशीर्वादाने करतो? हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
याबाबत सचिव भाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधित तोतया अडत्याने गोंडाणे यांना नकली चेक देऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सचिव भाकरे हे गोंडाणे यांची तक्रार निकाली काढली आहे असे पत्र देऊन आपण संबंधित आरोपींना पाठीशी घालतात हे सिद्ध होते. संबंधित अडत्याने ॲक्सिस बँकेची नकली आरटीजीएसची पावती बनवून गोंडाणे यांना १२/४/२०२२ या तारखेची दिली आहे. त्यामुळे संबंधित नकली अडत्या हा आपल्या बाजार समितीत कोणाच्या आशीर्वादाने व्यवहार करीत आहे याचे स्पष्टीकरण देण्याची व रक्कम मला त्वरित मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे गोंडाणे यांनी केली आहे.
याबाबत यापूर्वीही निवेदन दिलेले आहे मात्र आपण गोंडाणे यांची फिर्याद व निवेदन गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे सचिव हे आपल्या पदाच्या जबाबदारीचे निर्वहन करत नाही व संबंधित व्यापारी अडत्यांना पाठीशी घालत आहेत हे सिद्ध होते.
संबंधित अडत्याकडून त्वरित पैसे वसूल करून मला रक्कम मिळून द्यावी. त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील व इतर ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांच्या रकमा अशा प्रकारे व्यापाऱ्यांनी अदा केलेल्या नाहीत असे समजते.
त्यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांची कारंजा लाड बाजार समितीमध्ये फसवणूक होत आहे. संबंधित फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई न करता पाठीशी घालत असल्याने कारंजा बाजार समितीचा विश्वास हा गमावल्या जात आहे.
यासाठी आहात. संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करून रक्कम मिळून न दिल्यास बाजार समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा विनोद गोंडाणे यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे इतरही अन्यायग्रस्त शेतकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबतील असा इशारा गोंडाणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Comments