परशराम महाराज पुण्यतिथी महोत्सव व तुकाराम बीज साजरा.

परशराम महाराज पुण्यतिथी महोत्सव व तुकाराम बीज साजरा.

मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न.


उत्तम ब्राम्हणवाडे 

तालुक्यातील शिरपूर या गावी गेल्या अकरा वर्षापासून श्री संत परशराम महाराज पुण्यतिथी महोत्सव व तुकाराम महाराज बीज उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा सोमवार दिनांक 6 मार्च 2023 ते फाल्गुन कृष्णपक्ष गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी लोकवर्गणीतून शिरपूर येथे श्री हनुमान मंदिरामध्ये श्री संत परशराम महाराज, तुकाराम महाराज व विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान सकाळी काकड आरती, सायंकाळी हरिपाठ, व रात्री 9 ते 11 च्या दरम्यान हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 ला ह.भ.प प्रेमदास महाराज यांचे काल्याची कीर्तन झाले नंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी गावामधून तुकाराम गाथा व परशुराम महाराज व तुकाराम महाराज यांचे प्रतिमेचे दिंडी काढण्यात आली. यादरम्यान वारकरी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ यांनी उपस्थिती मांडली. व गावकऱ्यांच्या उत्साहात संपूर्ण कार्यक्रम आनंदात पार पडला.

Comments

Popular posts from this blog

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !