अंजनगाव बारी विद्युत परिमंडळात विविध समस्येने नागरिक त्रस्त.
अंजनगाव बारी विद्युत परिमंडळात विविध समस्येने नागरिक त्रस्त.
घरघुती विजेच्या लंपडव्यासह ज्यादा विज बिल आकारणी व नवीन नादुरुस्त विजमीटर जोडणीपासून ग्राहक वंचित.
उत्तम ब्राम्हणवाडे
अंजनगाव बारी विद्युत उपकेंद्र मंडळात घरघुती विजेच्या बाबतीत ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असुन त्यामध्ये नियमित विजपुरवठा खंडित होणे,रिंडिंग प्रमाणे विज बिल न देता ज्यादा भुर्दंड व नवीन विजमिटर ग्राहकांना न मिळणे या समस्यांचा उल्लेख यामध्ये करीता येईल.
विविध नैसर्गिक साधनांचा उपयोग करून विज तयार केली जाते व ती ग्राहकांपर्यंत पोहचवली जाते तयार केलेली विज साठवता येत नसुन तिचा वापर करुन ती ग्राहकांना पुरवावी लागते नाही तर ती नष्ट होते.त्याप्रमाणे अंजनगाव बारी येथे काही दिवसापासून घरघुती विजेच्या लंपडव्यात वाढ झाली असुन ग्राहकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच उपकेंद्रात पाण्याची व्यवस्था नसुन अर्थिंगवर पडलेल्या ओव्हरलोडमुळे विज पुरवठा वारंवार खंडीत होतो.त्यामुळे घरघुती ग्राहकांसह,व्यावसायिक विजेवर चालणारे दुकाने यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दैनंदिन वापरातील विज बिलातील सर्व करांत वाढ झाल्याने व मिटींग रिडींग नुसार मागेपुढे नेल्याने ग्राहकांना विजेच्या बिलात ज्यादा भुर्दंड बसत असुन दिवसेंदिवस या तक्रारीमध्ये वाढ होत आहे. तसेच मागील काही दिवसांमध्ये फाँल्टी मिटरच्या तक्रारीमुळे अंदाजी बिल ग्राहकांना येत असुन वाढीव ज्यादा बिलाच्या रकमेमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत असुन नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
अंजनगाव बारीतील काही ग्राहकांचे विजमीटर तांत्रिक कारणांमुळे बंद आहे तर काहीमध्ये बिधाड असल्यामुळे ते पुर्णतः बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ग्राहकांना महिन्यावारी एकच विजबिल येत आहे. यासाठी ग्राहकांनी उपकेंद्रात नवीन मिटरसाठी अर्ज केला असता कंपनीकडे नवीन मीटरच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.काही ग्राहकांनी गेल्या दोन वर्षापूर्वी मीटरची रक्कम कार्यालयात जमा केली असुनही अजूनही त्यांना नवे मीटर उपलब्ध झाले नसुन नवे मीटर कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यानी या बाबींकडे लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
Comments