प्रत्येक महाविद्यालय स्तरावर शेतकरी समुपदेशन केंद्र स्थापन व्हावे -डॉ नितीन टाले.

प्रत्येक महाविद्यालय स्तरावर शेतकरी समुपदेशन केंद्र स्थापन व्हावे -डॉ नितीन टाले.

उत्तम ब्राम्हणवाडे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रदेश म्हणून अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रदेशाची ओळख झालेली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. आर्थिक, सामाजिक ,मानसिक व राजकीय घटक त्यासाठी कारणीभूत आहे. यावर उपाय शोधण्याकरिता शेतकऱ्यांच्या शिक्षित मुलांनी आता पुढे येण्याची गरज आहे. त्याकरिता महाविद्यालय स्तरावर यावर संशोधन होऊन समुपदेशन केंद्र स्थापन व्हावे व संकटग्रस्त शेतकऱ्यांना या दृष्ट चक्रातून बाहेर काढण्याकरिता शेतकरी पुत्रांनीच आता पुढाकार घ्यावा असे मत अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ नितीन टाले यांनी व्यक्त केले , रा से यो विशेष शिबिर समारोप प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. 
विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर चे ७ दिवसीय विशेष शिबिर जावरा मोडवन येथे आयोजित करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. अलका भिसे , प्रमुख अतिथी म्हणून सरपंच उमेश दहातोंडे, डॉ. मधुकर दहातोंडे, कार्यक्रम अधिकारी प्रा.निशांत जयस्वाल,प्रा. काकडे , पोलीस पाटील गोपाल दहातोंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन, रोपवाटिका, आरोग्य शिबीर, ग्रामस्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, पशु चिकित्सा शिबीर अशा विविध उपक्रमाचे आयोजन या शिबिरामध्ये करण्यात आले. गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे या शिबिराची वैशिष्ट्य होते .

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात