विद्यार्थी बनले पत्रकार-जि.प.शाळेचा उपक्रम.

विद्यार्थी बनले पत्रकार-जि.प.शाळेचा उपक्रम.

शिक्षक अंकुश गावंडे यांची संकल्पना.

उत्तम ब्राम्हणवाडे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगरूळ चवाळा, या तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील शिक्षक अंकुश गावंडे यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला. ते नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवित असतात. या वेळी परिसर अभ्यास या विषय अंतर्गत वर्ग 4थी तील विद्यार्थ्यांनी गावातील कुटुंबांची माहिती गोळा केली. या साठी विद्यार्थ्यांनी न्यूज रिपोर्टर ची भूमिका घेऊन कुटुंबातील सदस्यांची मुलाखत घेतली. त्या साठी विद्यार्थ्यांनी ZP SCHOOL NEWS, MANGRUL CHAWALA या नावाने माईक सुद्धा स्वतः बनविले व त्याचा प्रत्यक्ष उपयोग करून कुटुंबाची मुलाखत घेतली. 
या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांनी कुटुंबातील सदस्यांना विविध प्रश्न विचारून माहिती संकलित केली. त्यात कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाचा व्यवसाय, कुटुंबातील सदस्य संख्या,कुटुंबातील सदस्यांची नावे, कुटूंबातील शाळेत शिकणारी मुले किती ? अशा प्रकारचे विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी माहिती संकलित केली. संवाद व संभाषण कला विकसित होणे, स्वपरिचय देणे यासारखे कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी बनावे या करिता अंकुश गावंडे यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाची दखल समग्र शिक्षा महाराष्ट्र (Maharashtra Prathamik Shikshak Parishad) MPSP, Mumbai यांनी घेतली व समग्र शिक्षा महाराष्ट्र च्या ऑफिसिअल Twitter, Facebook, Instagram, handle आणि Youtube Channel वरून हा उपक्रम प्रकाशित करण्यात आला आहे.
अंकुश गावंडे यांनी या सारखे विविध उपक्रम राबविले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व वृक्षारोपण व संवर्धन बाबतीत जनजागृती व्हावी World Wide Green Project नावाचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुद्धा सुरु केला आहे.ज्यामध्ये सध्या 50 देशातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत.या प्रकल्पाची दखल सुद्धा समग्र शिक्षा महाराष्ट्र कडून घेतली व त्यावर एक documentary बनवून प्रसिद्ध केली आहे.विविध तंत्रज्ञाचा वापर करून ते अध्यापन करतात व विद्यार्थ्यांचा गुणवत्ता पूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य विचार गटाचे सदस्य व समग्र शिक्षा महाराष्ट्र च्या राज्य समितीचा म्हणून त्यांची निवड झाली आहे.

Comments

Thanks for supporting Bhau
Thank you sir 🙏🏾🙏🏾

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !