वाट पाहीन,पण एसटीनेच जाईन!
वाट पाहीन,पण एसटीनेच जाईन!
खाजगी वाहनाना बसतोय फटका.
सवलातीने महिलावर्ग आनंदात.
उत्तम ब्राम्हणवाडे
महाराष्ट्र शासनाने एसटीच्या प्रवासामध्ये महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत दिल्याने महिलावर्ग खूश असून, परगावी जाताना वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, असा सूर ग्रामीण भागातील महिलावर्गातून ऐकावयास मिळत आहे. या सवलतीमुळे महिलांचा एसटीने प्रवास करण्याचा ओघ वाढला असून, महिला प्रवाशांमुळे एसटी हाऊसफुल्ल होत आहे. दरम्यान, शासनाने महिलांना एसटी प्रवासामध्ये दिलेल्या ५० टक्के सवलतीमुळे खासगी वाहन व्यवसायाला मात्र मोठा फटका बसला आहे.
शासनाने यापूर्वी ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासामध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी ७५ वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांना मोफत एसटी प्रवासाची योजना सुरू केली, तर सध्या महिला सन्मान योजनेंतर्गत सरसकट महिलांना एसटी प्रवासासाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत योजना सुरू करून त्वरित या योजनेची अंमबजावणी सुरू केली आहे.
त्यामुळे महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यापूर्वी परगावी प्रवास करताना एसटी न आल्यास बहुतांश महिला एसटीची प्रतीक्षा न करता पर्यायी व्यवस्था म्हणून मिळेल त्या खासगी वाहनाने प्रवास करत होत्या. परंतु, सध्या शासनाने एसटी प्रवासामध्ये
महिलांना सवलत दिल्याने खासगी वाहनांना मोठा फटका बसला आहे. यापूर्वी खासगी वाहतुकीने प्रवास करणाऱ्या महिला आता एसटी प्रवास करताना दिसत आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीला अपेक्षित असे प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. महिलांचा प्रतिसाद कमी झाल्याने खासगी वाहतुकीची गाडी वेळेत भरत नाही. केवळ पुरुष प्रवाशांच्या भरवशावर हा व्यवसाय करणे म्हणजे दिवसाला खासगी वाहतुकीची एक फेरी पूर्ण होणे अशक्यप्राय झाले आहे. महिलावर्ग आता एसटीप्रवासालाच पसंती देत आहेत. परिणामी, यापूर्वी एसटीची प्रतीक्षा करण्यास कंटाळा करणाऱ्या या महिला आता वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन, असा सूर लावताना दिसत.
खासगी वाहनांना बसतोय फटका.
..............................................
महिलांना सवलत दिल्याने खासगी वाहनांना मोठा फटका बसला आहे. यापूर्वी खासगी वाहतुकीने प्रवास करणाऱ्या महिला आता एसटी प्रवास करताना दिसत आहे. त्यामुळे खासगी वाहतुकीला अपेक्षित असे प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. महिलांचा प्रतिसाद कमी झाल्याने खासगी वाहतुकीची गाडी वेळेत भरत नाही. केवळ पुरुष प्रवाशांच्या भरवशावर हा व्यवसाय करणे म्हणजे दिवसाला खासगी वाहतुकीची एक फेरी पूर्ण होणे अशक्यप्राय झाले आहे. कारण, अलीकडच्या काळात बहुतांश पुरुष दुचाकी मोटारसायकलवरून प्रवास करत असतात.
Comments