केमिकलयुक्त आंबे ठरताहेत आरोग्यास हानिकारक
मधुर रसाचा काळ सोकला
गावठी आंबा झाला हद्दपार
व्यापारी मात्र कमाई करण्यात मग्न
उत्तम ब्राम्हणवाडे.
उन्हाळा सुरू होताच बाजारात आंब्याची दुकाने सजतात. याच उन्हाळ्यात प्रत्येक घरी महिला कच्च्या आंब्याचे लोणचे, मुरंबा आणि विविध प्रकारचे आंब्याचे पदार्थ बनविले जातात. याशिवाय उन्हाळ्यात उन लागू नये, उन्हाची दाहकता शरिराला ग्रासू नये यासाठी कच्च्या कैरीचे आब्याचे पन्हे, रस हे तर आवर्जुन तयार केलेलेच असते. त्यामुळे पिकलेल्या आंब्याचा मधूर रस उन्हाच्या दिवसांत बहुतेक घरांमध्ये प्यायला जातो. मात्र, आता सावधान होण्याची वेळ आली आहे. ते दिवस गेले. मधुर रसाचा काळ आता सोकला आहे. आता तर केवळ रासायनिक केमिकलयुक्त आंबे बाजारात आले आहेत. व्यापारी मात्र, केवळ आपले खिसे गरम करण्यात मग्न आहेत.
मागील पाच ते सात वर्षांपासून फळांचा राजा आंबाही विषयुक्त बनला आहे.केमिकलने कुत्रीम पद्धतीने पिकविलेल्या आंब्यामुळे अनेक वेळा आरोग्यावर विपरीत परिणामही दिसून येत आहे. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा पिकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी रसायनांचा लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
आंब्याच्या फळांनी सजलेला बाजार लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरू शकतो. कारण फळे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केला जात आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात बाजारात विक्रीसाठी येणारे आंबे विषारी रसायन वापरून पिकविले जातात. हा आंबा खाल्ल्याने आरोग्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे हंगाम येण्यापूर्वी बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे खरेदी करू नका, असा सल्ला संबंधीत विभागाचे अधिकारी देत असतात. रासायनिक पदार्थांचा वापर करून पिकवलेले आंबे खाल्ल्याने पोटासंबंधीचे आजार होण्याची दाट शक्यता आहे. केवळ कमाईसाठी व्यापारी व विक्रेते आंब्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच बाजारात विकत आहेत. याबाबत संबंधित विभागाने कार्यवाही करावी.
---------------------------------------
कॅल्शियम कार्बाइड ठरतेय जीवघेणे.
---------------------------------------
हापूस आंब्याला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. अनेक वेळा आंब्याचा सीजन सुरू झाला की, बाजारात आंब्याची दुकाने थाटली जातात. मात्र, हे आंबे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र व्यापाऱ्यांना जनतेच्या आरोग्याशी काही देणेघेणे नाही. अनेक आंबे कॅल्शियम कार्बाइड नावाच्या रासायनिक पदार्थाने पिकविले जातात. या रसायनामुळे सामान्य रंग इतका पिवळा दिसतो. परंतु कृत्रिमरित्या पिकविलेल्या त्या आंब्याला ना चव असते. आणि नाही आंब्याचा रसाळ सुगंध. या आंब्याच्या सेवनाने किडनी आणि यकृतावर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर मंडळींचे मत आहे.
----------------------------------------
गावठी आंबा शहरातून झाला हद्दपार.
----------------------------------------
उन्हाळ्याच्या हंगामात विशेषतः एप्रिल व मे महिन्यात आंब्याची पूर्ण वाढ होऊन गावठी आंबा बाजारात येतो. पण, तो देखील कोठे-कोठे ग्रामीण भागातच उपलब्ध होतो. शहरातून तर गावठी आंबा कधीचाच हद्दपार झाला आहे. आता केवळ रसायनयुक्त आंबेच उपलब्ध होत असल्याने केवळ लहानपणी खाल्लेल्या रसाळ गावठी आंब्याची आठवण तेवढी उरली आहे.
Comments