टिमटाळा-अंजनगाव बारी पुलबांधणीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष.
तीन किलोमीटर च्या डांबरीकरण रस्त्याचे काम अपूर्णच.
उत्तम ब्राम्हणवाडे.
लाखो रूपयांचा निधी खर्चून सुद्धा पूर्णत्वास न आलेल्या आणि दोन विधानसभेच्या हद्दीत विभागलेल्या टिमटाळा-अंजनगाव बारी रस्ता डांबरीकरण व त्यादरम्यानच्या एका पुलबांधणीकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असून तीन किलोमीटर चा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी दहा वर्ष का लागत आहे, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे. कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार श्रध्देय एकनाथजी रानडे यांचे जन्मगावाला जोडणारा टिमटाळा-अंजनगाव बारी हा तिन किलोमीटर चा रस्ता दोन किलोमीटर बडनेरा विधानसभेच्या हद्दीत तर उर्वरित रस्ता धामणगाव रेल्वे विधानसभेच्या हद्दीत येत असल्याने लाखो रूपयांचा निधी मंजूर होऊन सुध्दा श्रेयाच्या राजकारणापायी जनप्रतिनिधी व प्रशासनाने दूर्लक्ष करित रेल्वे, बाजारपेठ,आरोग्य, शिक्षण या महत्वपूर्ण गरजांची दैनंदिन दळणवळणापासून वंचित ठेवले आहे. तक्रारी, निवेदने व प्रसारमाध्यमांद्वारे जनसामान्यांना होणा-या त्रासाची झळ प्रशासनापर्यंत पोहोचवून कित्येक वर्षांनंतर मिळालेला लाखो रूपयांचा निधी कोणत्या विभागाला मिळाला हे अद्यापही कळले नाही कारण कागदोपत्री पूर्णत्वास झालेले रस्ते प्रत्यक्षात मात्र अपूर्ण आणि गोटाळीमय झाले आहे? हा महत्वपुर्ण रस्ता दोन विधानसभेच्या मतदारसंघामध्ये विभागला गेल्याने जनप्रतिनिधींच्या आश्वासनरूपी महापूराने टिमटाळा-अंजनगाव बारी रस्त्यावरील पूलचं वाहून गेला. शेवटी पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून हा रस्ता डांबरीकरण करण्याचे ठरले मात्र तीन किलोमीटर पैकी एक किलोमीटर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी साधारणतः सहा महिन्याचा कालावधी लागत असेल तर आणखी संथ गतीने प्रशासन काम करीत असून याकडे मात्र कोणाचीही कृपादृष्टी लाभत नाही. पावसाला दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असून संबंधित जनप्रतिनिधी, प्रशासन व अधिकारी कशात व्यस्त आहे हे मात्र सामान्य जनतेला कळले नसून टिमटाळा-अंजनगाव बारी रस्त्यावरील पुलबांधणी व उर्वरित रस्ता डांबरीकरण तातडीने करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी केली आहे.
Comments