माजी विद्यार्थ्यांनाडून अंकुश गावंडे यांचा सत्कार व निरोप समारंभ.
माजी विद्यार्थ्यांनाडून अंकुश गावंडे यांचा सत्कार व निरोप समारंभ.
उत्तम ब्राम्हणवाडे.
19 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ चवाळा च्या सण 2010-11 च्या वर्ग चौथी च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्री अंकुश गावंडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम व स्नेहमिलन आयोजीत केला होता. अंकुश गावंडे यांची शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती सण 2010 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ चवाळा येथे झाली होती त्यावेळी त्यांना वर्ग चौथी ला वर्गशिक्षक म्हणून जबाबदारी मिळाली होती. त्यांनी त्यानंतर शाळेत विविध उपक्रम राबविले, अनेक शैक्षणिक संशोधन व कार्यक्रम सुरु केले.लोकवर्गणी करून तालुक्यातील पहिली डिजिटल शाळा केली, विविध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सर्वांगीण विकास केला. त्यांनी वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट नावाचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प सुरु केला ज्यामध्ये सध्या 50 पेक्षा जास्त देशातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी आहेत. विद्यार्थ्यांना विविध देशातील शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणणे, ऑगमेंटेड व व्हर्चुअल रियॅलिटी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर, विविध शैक्षणिक ऍप्प निर्मिती असे अनेक नवनवीन तंत्रज्ञान ते आपल्या अध्यापनात वापरतात.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक संस्थांकडून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राज्य पुरस्कार तसेच जिल्हा परिषद अमरावती कडून जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. शासनाला शैक्षणिक सल्ला देण्या साठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य विचार गट सदस्य व समग्र शिक्षा महाराष्ट्र (एम पी एस पी, मुंबई) च्या राज्यस्तरीय समिती चे सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.त्यांची मंगरूळ चवाळा येथून पुढच्या शैक्षणिक वर्षात बदली होणार हे कळताच त्यांच्या नियुक्ती च्या पहिल्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार व निरोप समारंभ आयोजीत केला हेच एका शिक्षकाने केलेल्या उत्कृष्ट कामाची पावती आहे. तब्बल 13 वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्र आले व नांदगाव खंडेश्वर येथील योगिनी मंगल कार्यालय येथे कार्यक्रम आयोजीत केला गेला. या मधे सुरुवातीलाच अंकुश गावंडे यांचे औक्षवंत करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एका एकाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यात त्यांनी सध्या सुरु असलेले शिक्षण, व्यवसाय तसेच त्यांचे पुढील ध्येय व स्वप्न सांगितले. सर्वांनी आपल्या प्राथमिक शाळेतील आठवणी तसेच वर्गशिक्षक म्हणून अंकुश गावंडे यांनी कसे घडविले त्या आठणींना उजाळा दिला. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी श्री अंकुश गावंडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान केला.विद्यर्थ्यांकडून पुष्पगुच्च व फोटो फ्रेम देण्यात आली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची व विविध खेळ खेळून लहानपनाच्या दिवसाच्या आठवणी ताज्या केल्या. अंकुश गावंडे यांच्या कडून सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेची आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना मोमेंटो देण्यात आल्या. कार्यक्रम स्थळी भोजनाची व्यवस्था सुद्धा केली गेली. त्यानंतर शेवटी अंकुश गावंडे यांचे मनोगत घेण्यात आले त्यात त्यांनी आपला 13 वर्षातील मंगरूळ चवाळा येथील शाळेतील शिक्षक म्हणून प्रवास व विविध उपक्रम व नवोपक्रम यावर प्रकाश टाकला तसेच कसा खडतर प्रवासात शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून नोकरी मिळविण्या पर्यंत चा सर्व अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसोबत व्यक्त केला.हे सर्व ऐकून विद्यार्थी भावनिक झाले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गीत गायन केले व त्यांच्या भावी जीवनातील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये विविध उच्च शिक्षण घेणारे एम बि ए, एम एस सी, बि एस सी, बि फार्म असे तसेच धंदा व्यवसाय करून शिक्षण घेणारे असे सर्व 30 विद्यार्थी एकत्र आले होते.त्यांच्या विद्यार्थ्यांप्रती प्रेम भावना व उत्कृष्ट अध्यापन याचेच हे फलित आहे म्हणून मागील 13 वर्षानंतर सुद्धा हे विद्यार्थी त्यांना व त्यांच्या कार्याला विसरू शकले नाहीत. या कार्यक्रमाचे संचालन ईशा बिसने (एम बि ए विद्यार्थी ) व श्वेता चरपे (एम एस सी विद्यार्थी) यांनी केले. तसेच कार्यक्रमाला पल्लवी गुल्हाने,प्रतीक्षा शहाडे, तन्वी पिंपळकर, पल्लवी टांगले, प्रगती तांबडे, काजल शुक्ला, पूजा साकोरे,वैभव शुक्ला, तेजस पिंपळकर, हिमांशू इलमे, रोहित राऊत, चंद्रकांत पिंपळकर, प्रथमेश गावनेर, प्रतिक सारवे, प्रतिक पिंपळकर, वैभव टांगले, संकेत कमलापुरे, दर्शन गुप्ता, योगेश पांडव,सचिन लायबरे,सुरज पारधी, निखिल चव्हाण, ऋषिकेश शेलोकार,तेजस पारधी इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते.
Comments