साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी नवनगरचा अडथळा दूर करा.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी नवनगरचा अडथळा दूर करा.

उत्तम ब्राम्हणवाडे.

मौजे मुंडमाळी गट क्रमांक 11 इ क्लास जमीन क्षेत्र ००४० पैकी ००११ मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहासाठी जागा नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला हस्तांतरित करण्यासाठी प्रस्तावित नवनगर चे आरक्षण दूर करा अशी मागणी अखिल भारतीय दलित अधिकारा आंदोलन च्या वतीने करण्यात आली आहे.
 नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत मुंडमाडी ईक्लास जमीन गट क्रमांक 11 मध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह बांधण्याबाबत आमदार प्रताप दादा अडसड यांनी सहमती दर्शवली आहे. ही जागा नगरपंचायतला हस्तांतरित करण्याबाबत तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांनी नगरचना आणि मूल्यनिर्धारण विभागाला पत्रव्यवहार केला होता. याबाबत या विभागाकडून तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना मिळालेल्या पत्रानुसार ही जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित नवनगर साठी राखीव असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले आहे.सदर जागा नवनगर विकास प्राधिकरण ला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पिढ्यानपिढ्या मातंग समाजाची वस्ती या जागेला लागून आहे. ही जागा उपेक्षित समाज घटक असलेल्या मातंग समाजाच्या सार्वजनिक व व्यक्तिगत कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. ही जागा नगरपंचायतला हस्तांतरित न केल्यामुळे सामाजिक सभागृह उभारण्यामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे समाज या सामाजिक सभागृहाच्या लाभा पासून वंचित राहत आहे. करिता याबाबत त्वरित दखल घेऊन ही जागा नवनगर विकास प्राधिकरण मधून वगळून सामाजिक सभागृहाच्या कामासाठी नगरपंचायत ला हस्तांतरित करावी,अशी मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय दलित अधिकारांदोलनचे राज्य उपाध्यक्ष तथा अमरावती जिल्हा सहयोग संजय मंडवधरे, भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर,नांदगाव खंडेश्वर तालुका सचिव अनिल हिवराळे, तालुका कार्याध्यक्ष हनुमान शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

Anonymous said…
Away some uttemji

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात