कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव खंडेश्वर निवडणूक अभिजीत पाटील ढेपे यांचे सहकार पॅनल विजयी.

परिवर्तन सहकार पॅनलचे ग्रामपंचायत गटात वर्चस्व.

सहकार पॅनलला अकरा जागा तर परिवर्तन सहकार पॅनल पाच जागी विजयी.

उत्तम ब्राम्हणवाडे.

 दिनांक 28/4/2023 रोजी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव खंडेश्वरच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी अभिजित पाटील ढेपे यांच्या सहकार पॅनलनचे अकरावी उमेदवार विजयी झाले आहेत.
विजय उमेदवार मध्ये सोसायटी मतदार संघातून डॉ. राजेंद्र पांडे, विलास सावदे, प्रमोद ठाकरे, धनंजय मेटकर, गजानन ढेरे, ज्ञानेश्वर हांडे, पंकज ठाकरे,प्रभात ढेपे,अंकुश कोल्हे, अर्चना कणसे, सोनाली लेंडे, हे अकरा उमेदवार विजयी झालेले आहेत. ग्रामपंचायत गटातून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वातील सहकार परिवर्तन पॅनलने चारही जागा पटकावून वर्चस्व सिद्ध केले आहेत. त्यात मतदारसंघातून परिवर्तन सहकार पॅनलचे उमेदवार दीपक सवाई,ओमप्रकाश सावळे, विजय अजबले, गजानन सावदे हे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्याच गटाचे हमाल मापारी मतदारसंघातून देखील कुरेशी मोहम्मद जावेद विजय झाले आहेत.या निवडणुकीत विद्यमान आमदार प्रताप अडसड यांच्या भाजप प्रणित शेतकरी एकता पॅनलचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यांनी 11 जागी आपले उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यांच्या पॅनलला अत्यल्प मते मिळाली आहेत. व्यापारी अडते मतदारसंघातून विवेक वैष्णव व जितेश (मोनू) जांडगा हे स्वतंत्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.
..............................................
नांदगाव खडेश्वर कृ. उ.बा. स.मध्ये एकून १८ संचालकासाठी मतदान झाले तसेच एकूण ४९ उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती या निवडणुकीत खालील गट होते.त्यामध्ये.
१) काँग्रेस, भाकपा,शिवसेना ( उद्धव ठाकरे) गट युती
२) सहकार नेते अभिजित ढेपे यांचा गट
३) भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा गट
असे तीन गट निवडणुकीत होते.

Comments

Anonymous said…
एकदम मस्त 💐💐

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात