अंजनगाव बारी येथील शेतकरी विविध योजनांपासून वंचित.
अंजनगाव बारी येथील शेतकरी विविध योजनांपासून वंचित.
उत्तम ब्राम्हणवाडे
अतिवृष्टीपासून मदतीपासून शेतकरी वंचित
यावर्षि आलेल्या अतिवृष्टी व परतीच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.तालुक्यातील नुकसान बघता बडनेरा मंडळातील मोठे गाव अंजनगाव बारी मात्र आर्थिक मदतीपासून वंचित राहील्याचे समजते.नुकसानभरपाई मदत व केलेल्या पाठपुराव्यानंतरही काहीच हाथी न लागल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली असल्याचे समजते.शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसह व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे याकडे लक्ष वेचले असता आतापर्यंत मदतीची आस लावणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यागत हा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले.शेती व्यवसायातील वाढती आव्हाने व महागाईने घेरलेल्या शेतकऱ्यांनी उसणवार घेतलेली कर्जे व बँंकाचे चुकारे इकडून-तिकडून पुन्हा कर्ज काढून कसेबसे चुकविले मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात सरकार सशपेल फोल ठरल्याचा दावा शेतकऱ्यांकडून उमटत असुन तिव्र शब्दात शेतकऱ्यांना रोष परिसरात जिणवत आहे.
पिकविम्यापासूनच्या लाभापासून वंचित
नुकासानात पिकांच्या संरक्षण व झालेल्या नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना संरक्षण मिळावे यासाठी पिकविमा काढला.रिलायन्स प्रायव्हेट कंपनीने नुकसानभरपाईची पाहणी करून मदतीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिली असता कित्येक शेतकऱ्यांना तटपुंजी रक्कम मिळाली असून झालेले नुकसान पाहता ति अतिशय कमी आहे. त्यामुळेच परिसरातील कित्येक शेतकरी पिकविमा मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.
नियमित कर्ज भरणारे शेतकरी प्रोत्साहपर हप्त्याच्या प्रतिक्षेत
नियमित बँकेचे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी कर्ज माफ झाले त्यावर्षीही बँकेचे कर्ज चुकविले अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहपर म्हणून ५० हजार रूपयांची मदत सरकारकडून आर्थिक स्वरूपात दिली जाते.मात्र यापासुनही काही शेतकरी वंचित राहिले असुन ते बँकांचे उंबरठे झिजवत आहे. हि रक्कम टप्प्या-टप्प्याने शेतकऱ्यांना मिळत असून काही शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याने त्याचा भ्रमनिरास झाल्याचे समजते.
पीएम किसान योजनेपासून शेतकरी वंचित
केंद्राने (दि २७ मार्च) रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २ हजार रुपयाचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांना खात्यात टाकण्यात आला. या योजनेनुसार हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते .,मात्र
महसुल विभागाकडून ही योजना आता केंद्राने कृषी विभागाकडे हस्तांतरित केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात
आली आहे.यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन,योजनेच्या आर्थिक लाभांपासून अंजनगाव बारी येथील शेतकऱ्याना वंचित रहावे लागले असुन शेतकऱ्यांना बँकेच्या येरझाऱ्या माराव्या लागत आहे.एकूण ८०० शेतकऱ्यांना २ हजार रूपयाचा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला असुन अंजनगाव बारीतील कित्येक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे समजते.
Comments