येवती येथील शिवारात विज पडल्याने शेतातील घर खाक.

घरातील कुटारासह साहित्य खाक,शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान.

उत्तम ब्राम्हणवाडे.

तालुक्यातील येवती येथील शेतात विज पडल्याने आलेल्या अचानक वादळी व विजांच्या कडकडासह आलेल्या पावसात शेतकऱ्यांच्या शेतातील घरात विज पडल्याने घरातील कुटारासह शेतीउपयोगी साहित्य जळून गेल्याची धक्कादायक घटना (दि.२०) रात्री गुरुवारी घडली.
            येथील शेतकरी देविचरण पांडुरंग रहाटे( ५९) यांच्या शेतात ही घटना घडली असुन शिवारातील घरातील जनावराकरीता असलेले २० ढासे कुटार,दोन मोटार केबल वायरची बंडले( १५० व ६०० फुटाचे),दोन चार्जिंग फवारणी यंत्रे,८ स्पींकलर ३० स्पिंकलरचे पाईप व काही प्रमाणात सागवानाच्या बल्ल्या जळून खाक झाल्याने देवीचरण रहाटे यांचे एकूण एक लाखांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात