माऊली (चोर) येथील कारभार महिलांच्या हाती.
गावामध्ये बहुतेक पदांवर महिला कारभारी.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली (चोर) येथे सरपंच,पोलीस पाटील,तलाठी या सह बहुतेक पदांवर महिला काम पाहतात. भारतीय घटनेनुसार महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळावा या करिता बहुतेक कामात आरक्षण दिलेल आहे.
त्याचा फायदा आज महिलांना होत असल्याचे दिसत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोकसंख्या व क्षेत्रफळच्या दृष्टीने मोठे असलेल्या गावा पैकी माहुली चोर एक मोठ गाव आहे.या गावातील मोजकेच पदे सोडले तर बहुतेक पदांवर महिला कार्यरत आहेत.ज्यात महत्वाची समजली जाणारे सरपंच,पोलीस पाटील व तलाठी हि पदे सुद्धा महिलाच सांभाळत आहे.येथे सरपंच पदावर संगीता झंजाट,पोलीस पाटील पदावर विध्या कोकाटे,तलाठी पदावर सविता चऱ्हाटे ह्या काम पाहत आहेत.तसेच सरपंच वगळता 9 सदस्य असलेल्या ग्रा.प.मध्ये रत्ना गोतमारे,माधुरी मेश्राम,निशा खंडारे,विभा ढगे,सुधा जाधव ह्या ५ महिला सदस्य आहेत.याशिवाय जि.प.शाळा मुख्यध्यापिका अर्चना जाधव ,आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ.शुभांगी दिघाडे ,पोस्ट मास्तर रुपाली पिंगळे, ग्रा.प.आपले सरकार केंद्र चालक शुभांगी नाडे,आरोग्य उपकेंद्रातील परीचारिका सुनिता करूले,समुदाय आरोग्य अधिकारी पूजा वानखडे,कोतवाल मनीषा लोहकरे,सि.आर.पी.वैशाली गाडेकर, अंगनवाडी सेविका सुरेखा गोपाळे, अनिता झंझाट,सुजाता गाडेकर,मदतनीस संगीता राऊत, रेखा सावदे,आशावर्कर जयश्री चोरे,नंदा भोयर आपली सेवा देत आहे.
Comments