निदानजी महाराज शेतशिवारातील रस्त्याचे मातीकरण शेतकऱ्यांनी केले लोकवर्गणीतून.
निदानजी महाराज शेतशिवारातील रस्त्याचे मातीकरण शेतकऱ्यांनी केले लोकवर्गणीतून.
उत्तम ब्राम्हणवाडे.
परिसरातील निदानजी महाराज देवस्थान परिसरात शेकडो शेतकऱ्यांची शेते आहेत.मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून येथील पाणंद रस्ते निष्क्रीय झाले असुन धड शेतकरी व मजुरांना शेतातून ये-जा करता येणे अशक्य झाले आहे.याबाबतीत संबंधित शेतकऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला असता,अद्यापही याबाबत दखल घेतल्या गेली नाही.परिणामी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या रस्त्याचे मातीकरणासाठी लोकवर्गणीतून बांधकाम करण्याचे धाडस दाखवले.
कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या भारत देशात मात्र जातीने या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत असल्याने येथील ४० टक्के शेतकरी हतबल झाले आहे. जर शेतात जाण्याकरिता रस्ताच नाही, तर व्यवसाय चालणार कसा? मजूर वर्ग शेतापर्यंत जाणार कसा,व मालाची बि-बियाण्याची ने-आण होणार कशी या सर्व बाबी लक्षात घेता शेकडो हेक्टर शेती दरवर्षी राज्यात पडित पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.कृषी ही देशाचा पाया समजल्या जात असुन जर पायाच कच्चा असेल तर इमारत( देश) कोठून पक्की राहणार असा तडाखा शेतकऱ्यांनी शासनाला लागावला आहे. निदानजी महाराज शेयशिवारातील रस्ता हा जावरा,जुनना,निभोंरा मार्गे नांदगाव खंडेश्वरला जोडला जात असुन हा रस्ता झाल्यास या गावाशी अंजनगाव बारीचा संपर्क जोडणे अत्यंत सोपे होणार आहे.व्यापारी व शेतकऱ्यांना हि एक सुवर्णसंधी ठरणारी बाब आहे.
या शेयशिवारातील रस्त्याची आणखी एक शोकांतिका म्हणजे गावातील सांडपाणी नियोजतरित्या गावाबाहेर काढले नसुन,हे सर्व पाणी या रस्त्याला मिळत असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच हलाखीची झाली आहे.या सर्व बाबी लक्षात घेता शासनाच्या मेहबाणीचे वाट न बघता स्वतःच लोकवर्गणीतून रस्त्याचे मातीकरण शेतकऱ्यांनी केले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून व लोकवर्गणीतून हे काम करण्यात आले या रस्त्याचे मातीकरण केल्याबद्दल निदानजी महाराज देवस्थानच्या भक्त मंडळींनी शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.यामध्ये
सुरेश भुरे,अतुल तिखे,किशोर भुरे,नंदु श्रीखंडे, राजेश्वर दारोकार, सुनील कुऱ्हाडे,साहेबराव गरूड व इतर शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले.
"शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या या रस्त्याचे बांधकामाकरिता गेल्या पाच वर्षापासून शासनाकडे मागणी रेटून धरूनही ' पाणंद रस्ता योजनेचा' लाभ रस्त्याला न मिळणे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.हा रस्ता थेट यवतमाळ राजमार्गाला जाऊन मिळतो.कितीतरी लहान मोठी गावे या रस्त्यालगत येतात तरीही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.ज्यामुळे शेतकऱ्यांचेच नव्हे तर व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे.
-- प्रशांत दारोकार,शेतकरी, अंजनगाव बारी
"शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या बैलबंडीचे नुकसान होत असुन यामुळे बैलांना दुखापती झाल्या आहे.हा रस्ता व्हावा म्हणून खासदार-आमदार यांच्या कडे वारंवार चर्चा करूनही रस्त्याचे काम न केल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे मातीकरण करण्यात आले.याचे श्रेय शेतकऱ्यांना जात आहे.शासनाने शेतात जाणारे पाणंद रस्ते पुर्ण केले असते तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती."
-- ज्ञानेश्वर भिवगडे, शेतकरी, अंजनगाव बारी
Comments