उष्णतेच्या झळांनी पशुपक्षी बेजार.
उष्णतेच्या झळांनी पशुपक्षी बेजार.
मुक्या पशू पक्ष्यांना झळ सोसवेना.
तापमानात झाली अचानक वाढ.
उत्तम ब्राम्हणवाडे
मार्च महिन्यातच उन्हाच्या झळांचा नागरिकांना त्रास जाणवू लागल्या असून, मुक्या पशू-पक्ष्यांनाही या झळा सोसवेना झाल्या आहेत. अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षी मूर्च्छित होतात आणि कोसळतात. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी 'डिहायड्रेशन'चा त्रास झाल्यामुळे गच्चीवर, आवारात, रस्त्यावर पडलेले दिसतात. प्राणी मित्रांना उष्म्याचा त्रास जाणवलेले पक्षी आढळू लागले आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असून, पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करा, असे आवाहन पक्षीप्रेमींकडून करण्यात येत आहेत.
होळीनंतर तापमानात बदल होऊन उन्हाळा सुरू होतो. परंतु, यंदा होळीपूर्वीच उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. तापमानातील बदलामुळे नागरिकांना संसर्गजन्य आजार जडत आहेत. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून, दुपारच्या वेळेस तापमानाचा पारा हा ४० अंशांच्या घरात गेला आहे.
..............................................
तालुक्यात पाणवठे तयार करण्याचे पक्षीप्रेमींचे आवाहन.
..............................................
. सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण झाले असताना मुक्या पशू-पक्ष्यांनाही याची झळ बसू लागल्याचे दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे माणसांना नकोसे होत असतानाच अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडणाऱ्या पक्ष्यांची अवस्था ही बिकट होऊ लागली आहे. तालुक्यात ठरावीक पट्ट्यातच वनराई टिकून राहिली असून, अनेक भाग हे ओसाड झाले आहेत. अशा भागांत अन्नाच्या शोधात पक्षी दर अंतरावर उडत जातात. याचवेळी उन्हाळ्याच्या झळा त्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पशुपक्षी हेही निसर्गाचा अविभाज्य घटक म्हणून पाहणे गरजेचे आहे.
अमरावती जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे अधिवासांचा मोठ्या प्रमाणात रास होत आहे. त्यामुळे असंख्य पशुपक्षी यांचा वास्तव्याचा परिसर नष्ट होत आहे.
जी काही वनसंपदा, पाणवठे आहेत तेथेही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेले आहे. खाड्या, तलाव, नद्या यामध्ये झालेले प्रदूषण यामुळे मोठी परिसंस्था नष्ट होत आहे. याचा परिणाम अप्रत्यक्षरीत्या मानवी जीवनावरही होत आहे. त्यामुळे मानवाने आपल्या आजूबाजूच्या पशुपक्ष्यांचे संवर्धन कसे होईल हे पाहणे आवश्यक आहे.
..............................................
भूत दया गरजेची
..............................................
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा वाढता तडाखा पाहता यापुढे याचा फटका पशू- पक्ष्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जवळच्या परिसरात पशू-पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय केली पाहिजे. जंगल, माळरान भागात पाणवठे आटत असून, पाण्याच्या शोधात पक्षी दूरवर उडत येतात. त्यांच्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करणे आवश्यक आहे. एखादा पक्षी मूर्च्छित होऊन पडलेला आढळून आला तर त्याला सावलीत गार हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. कलिंगड, काकडी, टरबूज असे थंड पदार्थ त्यांना या दिवसात खायला द्यावेत.असे आवाहन पशू प्रेमिकडून करण्यात येत आहे.
................................................
Comments
प्राणी पक्षी याची दखल घेतली तसेच मानवता दाखवली
खूप अभिनंदन
अभ्यासू लेखण
प्रा.दिपक अंबरते
9881278151