नांदगाव खडेश्वर येथील कोंडवाडा सुरूहोणार कधी.

नगर पंचायतीचे हेतुपुस्सर दुर्लक्ष.

मुख्याधिकारी हाकतात उंटावरून शेळ्या.

 उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर येथे एक अत्यंत पुरातन असा जनावरांचा कोंडवाडा होता त्या कोडंवाड्याची नगर पंचायतीने कोणतीही देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे तो आज जमीनदोस्त झालेला आहे ही जागा काही नागरिक हडपन्याचे कटकारस्थान करीत आहेत ?
या कोंडवाड्याची दुरुस्ती करून तो सुरू करण्याबाबत नगर पंचायतीच्या सभेत अनेकदा ठराव झालेत परंतु या नगर पंचायतीच्या कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे या कामाला विसर पडला आहे. या बाबत काही नगरसेवकांनी आवाजही उठविला परंतु मुख्याधिकारी यांच्या कामचुकार पणामुळे हा कोंडवाडा सुरू होऊ शकला नाही या कोडंवाड्या मधील सर्व साहित्य चोरट्यांनी लंपास केले असून याच्या आजूबाजूच्या सर्व भिंतीसुधा पडल्या असल्याने हा कोडंवाडा आहे किंवा नाही असा विचार डोळ्यासमोर येतो.येथे जनावरांचा कोंडवाडा नसल्याने शहरातील मोकाट जनावरे ही शहरा लगतच्या मोखड किवा येणस या गावातील कोडंवाड्यामध्ये पाठविण्यात येतात येवढी मोठी नगर पंचायत शहरात असताना त्यांच्याकडे जनावरांचा कोंडवाडा नसावा यापेक्षा लाजिरवाणी बाब कोणती असावी त्यामुळेच यांना शहरातील मोकाट जनावरे पकडुन खेडे गावातील ग्राम पंचायतीच्या कोडंवाड्यात न्यावी लागतात यापेक्षा लाजिरवाणी बाब काय असावी? आणि बहुतांश वेळी ही मोकाट जनावरे पकडल्याच जात नाहीत त्यामुळे ही मोकाट जनावरे रस्त्यावर कीवा नागरिकांच्या घरात मुक्त संचार करीत असल्याने नागरिकांना या जनावरांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढला असून नगर पंचायतीला या समस्येशी काहीही देणेघेणे नाही नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने येथील प्रभार धामणगाव रेल्वे येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे आहे याबाबत त्यांना विचारले असता ते कोणतेही उत्तर देत नसून ते फक्त उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत असतात त्यांना नांदगाव खंडेश्वर येथील समस्येशी काहीही देणेघेणे नाही.त्यामुळे येथील कर्मचारी सुद्धा चागलेच निर्ढावलेले आहेत ते सुद्धा नागरिकांच्या समस्या काय आहे याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे या नगरपंचायतीमध्ये हम करे सो राज या उक्तीचा प्रत्यय येतो आहे.या नगरपंचायतीला कुणीही वालीच राहिलेला नाही येथील समस्या दिवसेंदिवस आ वासून उभ्या आहेत आणि वाढतच आहेत परंतु याचेशी मुख्याधिकारी यांना काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.
या नगरपंचायतीने नागरिकांची मागणी असतानाही अद्यापपर्यंत याचे साधे अंदाज पत्रकसुद्धा तयार केलेले असून याबाबत कुठलाही पाठपुरावा सुद्धा केलेला नाही अधिकारी हे फक्त नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांच्या असंतोषाचा भडका कधीही उडू शकतो हे उल्लेखनीय !

मुख्य रस्त्यावर वाढला जनावरांचा मुक्त संचार

येथील अमरावती यवतमाळ या मुख्य रस्त्यावर बसस्थानक समोर मोकाट जनावरे ही मोठ्या प्रमाणात बसलेली असताना सुद्धा नगर पंचायतीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना दिसत नाहीत त्यामुळे ही जनावरे सैराट पाळतात आणि भरधाव वाहनाला जाऊन भिडतात त्यामुळे अपघाताच्या प्रमानात वाढ होऊन वाहन चालकाचे नुकसान तर होतेच परंतु मुक्या प्राण्यांना सुद्धा इजा पोहचत आहेत माणसाचा इलाज होऊन जाईल पण बीचाऱ्या मुक्या जनावरांचे काय ? याचे पाप या नगरपंचायतीला लागल्याशिवाय राहणार नाही.यामुळे याचा वेळीच बंदोबस्त होणे महत्वाचे आहे.येथे कोडंवाडा नसल्याने नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढलेला असून या समस्येकडे आता जिल्हाधिकारी यांनीच लक्ष देण्याची मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.
मागील वर्षी नगरपंचायतीने सदर कोडंवाड्याचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरी करिता पाठविले होते.परंतु कोडंवाड्याकरिता जास्त निधीची गरज असल्याने आम्हाला कमी निधी मंजूर झाला होता त्यामध्ये पूर्ण काम शक्य नसल्याने आता आम्ही सन २०२३-२४ मध्ये सुधारित अंदाज पत्रक तयार करून मंजुरीकरिता पाठविणार आहोत निधी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण कोंडवाडा हा नवीन बाधन्यात येईल.

  प्रशांत उरकुडे
प्रभारी मुख्याधिकारी
नांदगाव खंडेश्वर
....................................................................

Comments

Popular posts from this blog

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

बडनेरा-अंजनगाव बारी-गोळेेगाव बस बंद प्रवासी नागरिक त्रस्त.

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !