नांदगाव खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी सूरेंद्र खापरी तर बाळासाहेब रोहणेकर उपाध्यक्ष पदी.
अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा तर उपाध्यक्ष ढेपे यांच्या गटाचा.
उत्तम ब्राम्हणवाडे.
दी.6 एप्रिल रोजी खरेदी-विक्री संघ,नांदगाव खंडेश्वरची अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांचे विश्वासू व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत सुरेंद्र खापरी हे 8 मते घेऊन विजयी झाले तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सहकार नेतेअभिजीत ढेपे गटाचे बाळासाहेब रोहनेकर हे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले.त्याबद्दल त्यांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने पेढे व पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले यावेळी खरेदी विक्री संघाचे सभासद बंडूपंत पाटेकर, समीर दहातोंडे,मनोहर चोरे,स्मिता सावदे,वैशाली रिठे,बाळासाहेब रोहनेकर,संजय देवतले, दिनेश गिरी, प्रभाकर काळमेघ,त्यावेळी उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निशांत जाधव यांचेसह कार्यकर्ते सचिन रिठे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष दिपक भगत,सर्फराज खान,अमोल नरोडे,रमेश ठाकरे,मनीष सावदे ,विक्रम झाडें,प्रवीण सवई, शिवाजी चव्हाण,संजय घोंगडे,मनोज ढवसे,गजानन जावळकर,गजानन सावदे,गजानन भडके व इतर नेते उपस्थित होते.
Comments