बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास ग्रामसेवकाचा नकार.

फुबगाव व वाघोडा येथील कामगार वंचित.

उत्तम ब्राम्हणवाडे.

तालुक्यातील फुबगाव व वाघोडा येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेविका बांधकाम कामगारांना ९० दिवस केल्यानंतरही प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अनेक बांधकाम कामगार नोंदणी व लाभांपासून वंचित राहत आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनकडून गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात एकापेक्षा अधिक मालकांकडे काम करणाऱ्या अस्थायी स्वरूपाच्या बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकास प्रदान करण्यात आलेला आहे. यादृष्टीने गावातील विविध शासकीय व खासगी कामावर काम केलेल्या कामगारांना मालकाच्या अथवा संबंधित आस्थापनेच्या सह्या घेतल्यानंतर प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे. कामगारांनी मालकाकडून हमीपत्रावर स्वाक्षरी घेऊनही ग्रामसेवकओरड होत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात गेल्या एक वर्षापासून या दोन्ही गावातील बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरणापासून वंचित राहत आहेत.

याप्रकरणी योग्य ती दखल घेऊन बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटकचे राज्याध्यक्ष संजय मंडवधरे, भाकपचे जिल्हा सचिव सुनिल मेटकर, बाबाराव इंगळे, हनुमान शिंदे, अनिल हिवराळे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात